ट्रेकर मंडळी आणि आकाशातील ताऱ्यांचे अतूट नाते आहे. भटकंती करताना रात्री खुल्या आकाशाखाली, ताऱ्यांच्या साक्षीने गप्पा रंगवण्याची मजा काही औरच असते. त्यातून कॅमेरा बरोबर असेल तर त्या ट्रेक-ओ-ग्राफरच्या फोटोमध्ये आकाशात लुकलुकणारे तारे आलेच पाहिजेत. हा सुद्धा असाच एक भन्नाट फोटो. ताऱ्यांचे फोटो काढण्यासाठी तुम्हाला कॅमेराचे शटर किमान ३० सेकंद उघडे ठेवावे लागते आणि कॅमेरा ट्रायपॉडवर ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तसेच करड सुमारे १६०० ते ६४०० च्या मध्ये ठेवावा. फोटोमध्ये एखादी व्यक्ती घेतल्यास आकाशाचं अथांगपण अधिक अधोरेखित होते.
छायाचित्रकार : अमित कुलकर्णी