lp31ऋतूंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण. आषाढानं भरभरून दिलेलं पाणी जमिनीत खोलवर मुरतं आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे श्रावणातील सर्वत्र दिसणारं हिरवंगार वातावरण. इथं झाडझुडपं आणि गवत आपल्या वैभवाचा आणि समृद्धीचा अनुभव घेत असतात, मनसोक्तपणे हवेत डोलत असतात. चराचरात आनंद ओसंडून वाहत असतो. म्हणून श्रावण म्हणजे समाधान आणि समृद्धी. नदी व निर्झर यांच्या काठांवरील व डोंगरमाथ्यावरील हिरवं, कोवळं, लुसलुशीत गवत पाहिल्यावर ‘पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार’ या काव्यपंक्तीची प्रचीती येते. संगीतकाराच्या कानानं, चित्रकाराच्या डोळ्यानं आणि कवीच्या मनानं आजूबाजूला पाहिलं की, श्रावणाची अगणित दृश्यं आपल्या नजरेस पडतात. म्हणून श्रावण हा मला नेहमीच एखादा ‘बहुरूपी’ वाटतो.
आषाढात अनावर झालेले नदी-नाले श्रावणात पोटापुरतं म्हणजे पात्रापुरतं जगत असतात. गुरंढोरं श्रावणाची मेजवानी झोडत असतात. कुठंतरी डोंगरमाथ्यावर एखादा मेंढय़ांचा कळप एकोप्याने जगण्याचा आनंद लुटत असतो. श्रावण सुरू होताच नागांची पूजा केली जाते तर तो संपल्यावर लगेच गौरी-गणपती येऊन जातात. श्रावणातला ऊन-पावसाचा लपंडाव किती प्रेक्षणीय! सतत अंगावर झेलावा असा. उन्हात पाऊस आणि पावसात ऊन हे दृश्य म्हणजे खरोखरच अवर्णनीय आहे. म्हणूनच श्रावण हा जादूगार वाटतो, ऋ तुचक्राचा सुवर्णमध्य वाटतो.
श्रावणातलं वातावरण स्वच्छ, पारदर्शक असतं. इथे गार-गरमची अनामिक अनुभूती येते. निसर्ग थोडा विसावलेला असतो. माणसं थोडी निवांत बनतात, उपासतापास, मनन, चिंतन करू लागतात, अध्यात्मात मग्न राहतात.
श्रावण म्हणजे काही सांगण्याचा, श्रवण करण्याचा महिना. इथं पवित्र ग्रंथांचं नित्यनियमानं पारायण केलं जातं. पसायदानाचा प्रसाद चाखला जातो, त्यातील मैत्र आचरणात आणलं जातं.
श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न. श्रावण म्हण्जे निसर्गाचा समृद्ध संकल्प. श्रावणाची समृद्धी आणि सर्जनशीलता माणसाच्या सर्जनशीलतेला आवाहन करतात आणि आंग्ल कवी कीट्सच्या शब्दांत ‘ळँी स्र्ी३१८ ऋीं१३ँ ्र२ ल्ली५ी१ीिंष्टिद्धr(३९) याचे भान देतात.
आम्ही लहान असताना शालेय पाठय़पुस्तकात कर्तव्यदक्ष व मातापित्यांची सेवा करणाऱ्या श्रावणबाळाची कथा असायची. त्याचा त्या कथेतील दुखद अंत आजही अस्वस्थ करतो. एका प्रामाणिक मुलावर तशी वेळ का आली असेल हा मला सतत सतावणारा प्रश्न आहे. त्या श्रावणबाळाचे श्रावण महिन्याशी काही नाते असेल का? त्याचे नाव श्रावणबाळ असे का ठेवले गेले असेल असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतात. तो श्रावणबाळ आपल्याबरोबर कधीच असणार नाही. पण प्रत्येक श्रावण महिन्यात जन्मणारं बाळ हे मी ‘श्रावणबाळ’ असे समजतो आणि त्या श्रावणबाळासंबंधीच्या माझ्या भावना काव्यात्मक पद्धतीने व्यक्त करणं पसंत करतो कारण श्रावण हा प्रेरणांचा, सर्जनशीलतेचा महिना आहे असं मी मानतो. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ मला जीवनातील सुख-दु:खांचा प्रतीक वाटतो. श्रावणात जन्मलेल्या आणि जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाचे मी खालील कविता लिहून स्वागत करतो :
श्रावण आला, श्रावण आला
श्रावण-बाळही त्वरित आला
सौभाग्य आज सफल जहाले
नाते तयाचे देवाशी जडले
बाळ येताना घेऊन आला
पाऊस रिमझिम हलकासा
ओले गवत सुवर्ण बनले
ऊन-पावसात विश्व नाहले
नव्या जिवाशी जीवन नवे
हसतखेळत समरसले
मग कधी ऊन्हात कोवळ्या
बाळ कोवळा न्हाऊन गेला
मनामनात हर्ष साठला
देहादेहात जोश वाढला
श्वेतधारांच्या पदरामधुनि
बाळाने इंद्रधनू पाहिला
नव्या बाळाची दृष्टी नवी
इंद्रधनूत भिजून गेली
आभाळकडांनी सप्तरंगांनी
बाळाची मग दृष्ट काढिली
नजर निरागस या बाळाची
साक्ष देतसे त्या देवाची
काजळ टिकली गालावरची
राखण करते या बाळाची
डॉ. सहदेव चौगुले-शिंदे

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब