00nandanवर्षांतील जवळजवळ आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. मोठय़ा नवलाची गोष्ट म्हणजे, सुरणाला वर्षांतून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्रीएवढे मोठे असू शकते. सुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीस हा जमिनीतील कंद आपली सुप्तावस्था सोडून वाढू लागतो. त्याचा जमिनीबाहेर वाढणारा, सरळ उंच खोडासारखा वाढणारा अवयव म्हणजे सुरणाच्या एकुलत्या एक पानाचा देठ असतो. या पानाच्या देठावर सापाच्या अंगावर असणाऱ्या चट्टय़ासारखे चट्टे असतात. देठाच्या वरच्या टोकाला छत्रासारखे संयुक्त पान असते. या एकाच पानाच्या सहाय्याने सुरण आपले प्रकाशसंश्लेषणाचे काम करून, आपल्या जमिनीतील कंदात तयार झालेले अन्न साठवत असतो.
lp25सुरणाची लागवड करण्यासाठी बाजारातील सुरणाचे छोटे कंद उन्हाळ्यातच घेऊन ठेवावेत. मोठय़ा सुरणावर लगडलेले छोटे कंद निराळे काढूनही लागवड करता येते. लागवडीचे कंद लावण्यासाठी जमिनीत साधारण ४५ सेंमी व्यासाचा व तेवढय़ाच खोलीचा खड्डा करावा. या खड्डय़ाच्या तळाला पाला-पाचोळ्याचा साधारण दहा सेंमीचा थर द्यावा. पाला-पाचोळ्याच्या थरावर माती व शेणखताचे समप्रमाण मिश्रण खड्डय़ात काठापर्यंत भरून घ्यावे. खड्डय़ातील मातीत कंद आकारमानाप्रमाणे साधारण पाच ते दहा खोल पुरावेत. छोटे कंद जास्त
उथळ आणि मोठे कंद जास्त खोल पुरावेत. लागवडीसाठी थोडीशी सावलीची जागाही चालू शकते. मात्र पाणी साचून राहणारी जागा लागवडीस योग्य नसते; तेथे कंद कुजण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात कंदाला कोंब फुटल्यानंतर, पुढे आपल्यास काहीच काम करायची गरज नसते. पावसाला जर प्रलंबित खीळ पडली तर मात्र पाणी द्यावे लागते. सुरण ही अत्यंत कणखर वनस्पती आहे; तिला कसल्याही किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव सहसा होत नाही. एक मात्र लक्षात ठेवावे; ते म्हणजे, छोटा कंद लावल्यानंतर चांगला मोठा कंद तयार होण्यास साधारण तीन वष्रे लागतात. आपल्यास वाटेल की, तीन वष्रे थांबून एकच सुरण मिळवण्यापेक्षा दुसरी कोणतीही पालेभाजी, फळभाजी किंवा कंदभाजी लावून तीन ते चार महिन्यांतच पीक का घेऊ नये? तर याचे उत्तर म्हणजे इतर मोसमी भाज्यांची लागवड करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. आणि मुख्य म्हणजे लागवड केलेल्या सुरणाच्या एका कंदापासून आपल्याला अनेक छोटे कंद दरवर्षी मिळत राहतात. म्हणजे, पहिल्या तीन वर्षांनंतर दरवर्षी आपल्यास काहीही मेहनत न करता सुरण मिळत राहतात. ते छोटे कंद काढून परत लावणे एवढेच काम आपल्याला करावे लागते. तयार झालेला सुरण अनेक महिने चांगला टिकून राहतो, हाही एक मोठा फायदा असतो. कधी कधी सुरणाला विचित्र आकाराचे, भले मोठे फूल लागते. या फुलाला एक प्रकारचा मंद पण घाण वास असतो. सुरणाच्या या वासाने माश्या आकर्षति होतात. या माश्याच परागीकरणाचे काम करतात.
नंदन कलबाग response.lokprabha@expressindia.com

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा