01youthबाजारात सध्या सुंदर जंपसूट्स पाहायला मिळतात. पण एकाच पद्धतीने एकच जंपसूट सतत घालता येत नाही, म्हणून हे जंपसूट्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे घालता येतील?
– सोनल, २३

उन्हाचा दाह गेल्या काही दिवसांपासून वाढतोय आणि तो आता कायम राहणार आहे. पण या परिस्थितीतसुद्धा ‘कूल’ राहायचं असेल, तर तुमचा लूक कूल असलाच पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कपडय़ांची निवड. या दिवसांमध्ये तुम्हाला शॉपिंग स्ट्रीट आणि दुकांनामध्ये कमी वजनाचे, आरामदायी असे वन पीस ड्रेस, टय़ुनिक्स पाहायला मिळतील. पण या सगळ्यात ‘हायपोइंट’ आहे ‘जंपसूट्स’. या सीझनमध्ये जंपसूट्स ‘मस्ट हॅव्ह’ लिस्टमध्ये असलेच पाहिजेत. अर्थात सोनल, ‘एक जंपसूट किती वेळा घालणार?’ हा तुझा प्रश्न अगदीच बरोबर आहे. म्हणूनच हा पठ्ठय़ा, सर्वासोबत जुळवून घेतो. त्यामुळे जंपसूटसोबत स्टायलिंग करताना काहीच त्रास होतं नाही, उलट मजाच येते. सगळ्यात पहिली जोडी जुळते ती श्रगसोबत. डेनिम जॅकेट ते लायका श्रगपर्यंत विविध प्रकारच्या श्रग्ससोबत जंपसूट सहज मॅच होतो. lp75अर्थात तुझ्याकडे श्रग नसेल तर ओव्हरसाइज शर्ट ट्राय करायलाही हरकत नाही. फक्त कॉन्ट्रास मॅचिंग असलं पाहिजे.. याशिवाय ओव्हरसाइज बेल्ट्स, नेकपीस वापरून जंपसूटला वेगळा लूक देता येतो. तुझा जंपसूट जर शॉर्ट असेल तर त्यावर स्कर्ट घालून टय़ुनिक आणि स्कर्ट असा लूकसुद्धा देऊ शकतेस. नुडल्स स्ट्राइप्स जंपसूटच्या आत मोठय़ा बाह्यांचे टी-शर्ट घालून वेगळा लूक येतो. तुला हव्या त्या पद्धतीने ट्राय कर, नो लिमिट्स..

१९ मी शक्यतो शर्ट्स आणि डेनिम घालणं पसंत करतो. पण त्यात खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. विशेषत: पार्टीजना जाताना शर्ट्समध्येच थोडे बदल करून कॅज्युअल लूक कसा आणता येईल?
– सुयश, २५

सुयश, शर्ट्स घालणाऱ्या मुलांना ही समस्या नेहमीच भेडसावते. ऑफिसमध्ये सतत फॉर्मल ड्रेसकोड असल्याने शर्ट्स आणि ट्राऊझर घालण्याची सवय झालेली असते आणि त्यामुळे कपाटातील पूर्वीचे पार्टीवेअर गायब होऊ लागतात. पण म्हणून घाबरायची गरज नाही. सर्वात पहिले पार्टीसाठी शर्ट्स निवडताना स्ट्रेट फिटचे शर्ट्स निवड. त्यात प्रिंट्स, कलर्समध्ये एक्सपरिमेंट करणं उत्तम. सध्या मस्त टॅगलाइन्स, ईमोजी lp76असलेले शर्ट्स पाहायला मिळतात, ते ट्राय नक्कीच कर. त्यासोबत फंकी कफलिंग्स वापरू शकतोस. बो टाय सध्या ट्रेंडमध्ये आहेत. विशेषत: ओव्हरसाइज बो टाय. त्यातही मस्त रंग आणि प्रिंट्स पाहायला मिळतात. ते वापरून पाहा. नेहमीच्या टायमध्येही आता बारीक टाय पाहायला मिळतात. त्यामध्येसुद्धा मेटॅलिक रंग आणि प्रिंट्स असतात. त्याही वापरून पाहा. आपल्याकडे शर्ट्ससोबत ब्रेस खूप कमी जण वापरतात, पण पार्टी किंवा मीटअपला जाताना ब्रेस छान दिसतात.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत