lp37दु:खापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभराची सगळी धडपड सुरू असते. पण त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्गच आजही योग्य आहे.. ४ मेच्या बुद्ध जयंतीनिमित्त-

सध्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती व तंत्रज्ञानाचे, जाहिरातीचे आणि संगणकाचे आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ परिणाम हवा असतो. आपण सगळीकडे नुसती एक नजर टाकली तर आपल्याला असे आढळून येईल की हे सर्व विश्वच सारखे धावत आहे. सगळीकडे आपणास भयंकर गर्दीच गर्दी दिसून येते.  मग ते बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बँक, सरकारी, तहसील कार्यालय असो किंवा अगदी महागडी सेवा देणारी हवाई वाहतूक असो. सगळीकडे गर्दीच असते. सतत लोक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे नुसतेच जा-ये करीत असतात व नेहमीच गडबडीत असतात.
सध्याचे युग हे वर्ल्डवाइडवेब (ह.ह.ह.) या तीन अक्षरांमध्ये गुरफटलेले आहे. माहितीच्या भांडारात आपल्याला माहिती मिळविणे फारच सोयीचे झालेले आहे.
अगदी सुरुवातीच्या युगापासून तर आत्ताच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत आपण अवलोकन केले तर आपल्याला आढळून येते की, मानव हा सतत काही ना काही शोध लावण्याच्या विचारात असतो. तो ज्या अवस्थेत आहे त्यापेक्षा चांगल्या अवस्थेत असण्याच्या तो सतत विचारात असतो.  त्यामागे एकच कारण असते ते म्हणजे तो अगदी सुखात असण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या गरजा या वाढतच असतात. असे म्हणतात की माणसाच्या गरजा या कधीही पूर्ण होत नाहीत. एक गरज संपली की त्याची दुसरी गरज लगेच निर्माण होते.
अगोदर माणूस हा पायी भटकंती करायचा. मग त्याने घोडागाडी, बलगाडी व नंतर चाकाचा शोध लावला. पुढे मग सायकल, जीप मोटारगाडी, बस, रेल्वे व नंतर विमान असे शोध लागत गेले. मग मानवाने संपर्कासाठी पत्र, टेलिफोन व आता मोबाइल व इंटरनेटपर्यंत. दुसरीकडे मानवाने आजारांवर मात करण्यासाठी त्याने विज्ञानाच्या साहाय्याने विविध औषधे शोधून अगदी भयंकर रोगांपासून मुक्तता मिळविली.  सोनोग्राफी, प्लॅस्टिक सर्जरीसारखे उपचार तो करू लागला. मानवाला जसजशा समस्या येऊ लागल्या तसतशा त्यावर तो विज्ञानाच्या साहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न करू लागला.
माणूस हा अगोदर गुहेत राहायचा. कालांतराने तो घरात, वस्तीत मग नगरात, वस्तीत, वसाहतीत राहायला लागला. समूहाने जगायला लागला. त्याला वाटायचे की मी गुहेतून बंगल्यात राहायला गेलो तर मग मला आता शांती मिळायला हवी. माझे जीवन हे सुखमय व चनीच्या वस्तूंनी परिपूर्ण आहे. मला नक्कीच सुख मिळायला हवे. पंरतु आज आपण बघतो आहोत मानवाकडे एवढी धनसंपदा, सुखचनीच्या व त्याच्या हाती सत्ता असूनही मानव दु:खीकष्टी व वेदनेने गुरफटलेला आहे. तो सुख मिळविण्यासाठी सुखाच्या मागे जिवाच्या आकांताने धावतोच आहे, धावतोच आहे.
मानव सध्या तीन डब्ल्यूंनी वेढलेला आहे.  ते तीन डब्ल्यू म्हणजे वेल्थ, वाइन आणि विमेन. मानवाला वाटायला लागले की, या तीन डब्ल्यूंची मला जर चांगली साथ मिळाली तर माझे जीवन हे सुखमय होईल. पहिला डब्ल्यू म्हणजे वेल्थ, संपत्ती.  मानव विचार करतो की माझ्याकडे पसा आला की सर्व काही खरेदी करू शकतो, सुखचन एवढेच काय तर न्यायसुद्धा.  दुसरा डब्ल्यू म्हणजे वाईन (दारू) मुळे मी माझे दु:ख विसरू शकतो आणि तिसरा डब्ल्यू म्हणजे विमेन. मला सुंदर स्त्री,  मिळाली तर मग मला या जगात काही नको.  मला या पृथ्वीवर स्वर्गच मिळाला समजा. इथं पर्यंत ठिक आहे.
या तीन डब्ल्यूंच्या मर्यादेत न राहिल्यामुळे व या तीन डब्ल्यूंचा अतिरेक करण्यातच मानवाचे खरे दु:ख दडलेले आहे. कसा होईल मानव सुखी? कसा तो या सर्व समस्यांतून बाहेर पडेल? काही मार्ग आहे का मानवाला सुखी मार्गाकडे नेणारा? या प्रश्नांची उत्तरे मला तीन पुस्तकांचे वाचन केल्यावर मिळाली. ही तीन पुस्तके म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध आणि बुद्ध हसतो आहे. या  या पुस्तकांचे वाचन केल्यानंतर मला भगवान बुद्धांचा अष्टांग मार्ग कळला. या अष्टांग मार्गाविषयी-
१) सम्यक दृष्टी -सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन. जग जसे आहे, तसे ते दिसणे, जसे आहे तसे बघणे, त्यांचे रूप यथार्थतेने जाणणे. सम्यक दृष्टीसाठी स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार आवश्यक आहेत. माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते.
२) सम्यक संकल्प : प्रत्येक माणसाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी, ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी.
३) सम्यक वाणी : सम्यक वाणी याचा अर्थ खरे बोलणे. खरे व तेही मृदू, शिवाय अर्थपूर्ण, निर्थक बडबड न करता समयानुकूल म्हणजे सम्यक वाणी. बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय म्हणजे सम्यक वाणी.
४) सम्यक कर्म : सम्यक कर्म म्हणजे योग्य कर्म. सम्यक कर्म हे योग्य वतर्नाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन, हे त्याचे प्रमाण होय.
५) सम्यक उपजीविका : प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवावयाचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत.  काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांवर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत.  दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. याला सम्यक आजीविका म्हणतात. उपजीविका आवडीनुसार असावी. सम्यक आजीविका म्हणजे योग्य रीतीने जीवननिर्वाह चालवणे.
६) सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न, लोभ, द्वेष आणि मोहाचा नाश करून सत्याकडे जाण्याची गरज असते. ते अहितकारक विचार आहेत त्यांना मुळासकट उपटून टाकणे म्हणजे सम्यक व्यायाम. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ न देणे म्हणजे सम्यक व्यायाम होय.
७) सम्यक स्मृती : सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दृष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृती होय. अर्थातच व्यर्थ ते विसरणे व सार्थ ते स्मरणात ठेवणे.
८) सम्यक समाधी : सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते, सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.
केवळ माणसाच्याच नव्हे, तर जगातल्या सर्व प्राणिमात्रांच्या वाटय़ाला दु:ख येते, त्याच्या शरीर-मनाशी ते संबंधित आहे.  बुद्ध म्हणतात दु:खाचे मूळ तहान आहे. कामतृष्णा ही अशी तृष्णा आहे की, कामपूर्तीनंतरही तिचे कधी समाधान होत नाही. कामतृष्णेने पछाडलेल्या माणसाला पूर्तीच्या क्षणी कदाचित सुख मिळत असेल, पण नंतर तो अतृप्तीनेच पछाडलेला असतो. तर भवतृष्णा म्हणजे जगण्यावरचे प्रेम.
दु:खाचा समूळ नाश शक्य आहे. अर्थात त्यासाठी सर्व इच्छांचा समूळ नाश करण्याची आवश्यकता आहे. तृष्णेपासून मुक्त होणे म्हणजेच दु:ख निरोध.
तृष्णेमुळे मोह निर्माण होतो आणि हा मोह लोभ आणि मत्सराला जन्म देतो. हातून घडणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टीचे मूळ मोह आहे.  मोह नष्ट केला की सगळे अकुशल धर्म नष्ट होतात.
या अष्टांगासोबतच शील आणि प्रज्ञेलासुद्धा विशेष महत्त्व आहे.  शील म्हणजे नीतिमत्ता. िहसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, नशा आणणाऱ्या द्रव्याचे सेवन न करणे, दुसऱ्याच्या वस्तूवर हक्क न गाजवणे या पाच गोष्टींचा समावेश आहे. प्रज्ञा याचा अर्थ ज्ञान. सत्याचे ज्ञान. जग जसे आहे तसे पाहणे हे केवळ प्रज्ञेने शक्य होते. कोणत्याही गोष्टीचे सत्य स्वरूप जाणून घेण्यात ज्ञानच मदत करते, ज्या  गोष्टी  सुख देणाऱ्या आहेत असे वाटते त्या गोष्टींचे खरे रूप ज्याच्याकडे प्रज्ञा आहे त्याला कळते व वस्तुथिती स्पष्ट झाल्याने त्याच्या मनात कोणतेही गोंधळ उडत नाहीत. मन शांत झाले की आपोआप मनाची एकाग्रता साधते.  हे प्रज्ञेचे सर्वात मोठे कार्य आहे.
सुरुवातीला आपण बघितल्याप्रमाणे माणसाचे दु:ख हे तीन डब्ल्यूंमध्ये दडलेले आहे. या तिन्ही डब्ल्यूंचे निराकरण हे भगवान बुद्धांनी व वर बघितलेल्या अष्टांगिक तत्त्वज्ञानामध्ये अंतर्भुत आहेत.
मानवाला खऱ्या अर्थाने सुखाचा मार्ग शोधायचा असेल किंवा आपले जीवन सुखमय करायचे असेल तर भगवान बुद्धाचेच तत्त्वज्ञान आपल्याला सुखापर्यंत पोहोचवू शकते. अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिल्यावरसुद्धा भगवान गौतम बुद्ध म्हणतात की, जर तुम्हाला एखादी गोष्ट स्वीकारावयाची असेल, तर तुम्हाला ती पटली तरच ती स्वीकारा, दुसरे म्हणतात म्हणून स्वीकारू नका.  भगवान बुद्ध असाही उपदेश देतात की, अत्त दिप भव.. स्वत: पुढाकार घ्या आणि स्वयंप्रकाशित व्हा. स्वत:चा विकास तुम्ही स्वत:च करा.
चला भगवान गौतम बुद्ध जन्म दिनी संकल्प करू या की, आपण माणूस म्हणून मानवतावाद व भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान अभ्यासून मानव जातच ही करुणामय, मत्रीमय व मंगलमय करून विश्वभरात शांतता नांदो ही कामना करू या.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..
wardha, Akhil Bharatiya Andhashraddha Nirmulan Samiti, Cremation Holikotsav, Remove Superstitions, Associated with Graveyard, terav movie, Harish Ithape,
आज पौर्णिमेस स्मशानभूमीत ‘तेरवं, काय आहे प्रकार जाणून घ्या

– अरविंद मोरे