रघुवीर शंकर मुळगावकर (१९१८- १९७६) हे भावपूर्ण चित्रनिर्मिती करणारे चित्रकार म्हणून चित्रेतिहासात अजरामर झाले. महाराष्ट्रातील घराघरांत चित्र नेण्याचे काम मुळगावकरांनी केले. राजा रविवर्मानंतर देवदेवतांना सुंदर चेहरे देण्याचे काम मुळगावकरांनी केले. महाराष्ट्रातील अनेक घरांतील देव्हाऱ्यांत मुळगावकरांनी चेहरे दिलेल्या देवदेवताच विराजमान आहेत. चित्रकला लोकप्रिय करण्याचे काम मुळगावकरांनी केले. त्यांनी साकारलेले शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रस्तुतचित्रही महाराष्ट्रात विशेष गाजले. प्रसन्न रंगसंगती हे त्यांचे प्रमुख वैशिष्टय़ होते.
lp02