छायाचित्र – बिभास आमोणकर
केवळ हिमालयातच आढळणाऱ्या पॉपी प्रजातीतील दुर्मीळ फुलांची व्हाइट आणि ब्ल्यू पॉपी प्रजाती फक्त पश्चिम हिमालयातच आढळते. समुद्रसपाटीपासून ११ हजार ते १४ हजार फूट उंचीवरील हवामानात तीव्र उतार, खडकाळ- निसरडी जमीन असताना ढगाळ वातावरणात वाढणारी व्हाइट पॉपी शोधणे हेच मोठे जिकिरीचे असते. या प्रतिकूल वातावरणात या फुलाचा फोटो काढताना एक्स्पोजर स्कील परफेक्ट असावे लागते. दीड-दोन फूट उंचीच्या या झाडाचे फोटो जमिनीवर झोपूनच काढावे लागतात. महत्त्वाचे म्हणजे हे फूल फुलल्यानंतर केवळ चार पाच तासात ते सुकायला लागते. जपानी लोकांमध्ये या ब्ल्यू पॉपीला धार्मिक महत्त्व असल्यामुळे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला भेट देणारे जपानी पर्यटक या फुलाभोवती बसून प्रार्थना करतात. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मधील अशाच आणखी सुंदर व दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ११ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान होणार आहे.