निसर्गचित्रण आणि रानटी फुलांचे चित्रण करताना फिश आय लेन्ससारख्या आधुनिक तंत्राचा वापर केल्यास छायाचित्राला एकदम वेगळा नाटय़मय परिणाम मिळू शकतो. ही लेन्स वापरण्याचा दुसरा हेतू असा की, रानटी फुलं पाश्र्वभूमीस ठेवून भोवतालचे पर्यावरण १८० अंशामध्ये टिपता येते. आठ ते १५ एमएम झूमची फिश आय लेन्स सध्या उपलब्ध आहे. आठ एमएमच्या सेटिंगवर छायाचित्र घेतल्यास वरीलप्रमाणे गोलाकार फ्रेम मिळते. अर्थात विशिष्ट कामासाठी ही लेन्स विकसित केलेली असल्यामुळे थोडी महागडी आहे.
 

छायाचित्र : बिभास आमोणकर