01vijayदि. २९ मे ते ४ जून २०१५

मेष- रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडण्याकरिता तुमचे मन आसुसलेले असेल. त्यादृष्टीने तुम्ही नियोजन कराल. व्यापार-उद्योगात अतिपशाच्या मोहाने कोणतेही धाडस करू नका. तसेच हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरीमध्ये कामाचा थोडासा आळस येईल. त्यामुळे प्रत्यक्ष काम कमी कामाचा दिखावा जास्त कराल. नवीन जागा खरेदी करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती आणि कागदपत्रे याची खात्री करून घ्या. घरामध्येही ठरलेला एखादा कार्यक्रम पार पडेल. त्यानिमित्ताने दूरच्या नातेवाईकांचा सहवास लाभेल.

वृषभ -एखादी नवीन आणि वेगळी कल्पना साकार करण्याकरिता तुम्ही तुमची शक्ती आणि बुद्धी दोन्ही पणाला लावाल. व्यापार-उद्योगात एकंदरीत काम चांगले राहील. नव्याने सुरू केलेल्या एखाद्या योजनेला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये आपले महत्त्व वाढावे, या उद्देशाने तुम्ही वरिष्ठांना खूश कराल. नवीन नोकरी स्वीकारताना दिसते तसे नसते हे लक्षात ठेवा. घरामध्ये आवडत्या व्यक्तीला खूश करण्याकरिता एखादा विशेष कार्यक्रम कराल. त्याचा फायदा इतर सदस्यही उठवतील.

मिथुन- एखाद्या छोटय़ाशा कारणानिमित्त आप्तेष्ट आणि नातेवाईक तसेच ओळखीच्या व्यक्तीबाबत तुम्हाला दुरून डोंगर साजरे असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांची ये-जा चांगली राहिल्यामुळे पशाची आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये पूर्वी केलेले काम कदाचित तुम्हाला नव्याने करावे लागेल. घरामध्ये जरी माहोल आनंदी आणि उत्साही असला तरी पाहुण्यांचे रुसवे-फुगवे सहन करावे लागतील. खोटय़ा प्रतिष्ठेकरिता ऋण काढून सण साजरा करावा लागेल.

कर्क- सभोवतालच्या व्यक्तींचा मूड कसाही असो, तुम्ही मात्र खुल्या दिलाने जीवनाचा आस्वाद घ्यायचे ठरवाल. व्यापारउद्योगात आíथक स्थिती मनाप्रमाणे असल्यामुळे नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील. बाजारातील प्रतिष्ठित भागात किंवा दुसऱ्या शहरात अथवा देशात नवीन शाखा उघडावीशी वाटेल. नोकरीमध्ये जे अधिकार किंवा सवलती संस्थेतर्फे तुम्हाला दिल्या जात आहेत त्याचा थोडासा गरफायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य ठरलेले असेल तर त्यामध्ये तुम्ही उत्सवमूर्ती बनाल.

सिंह- तुमचा शब्द तुम्ही खाली पडू देणार नाही. मग अशा वेळी त्याची किंमत असली तरी त्याची पर्वा नसते. व्यापार-उद्योगात मात्र तुमच्या औदार्याचा मतलबी व्यक्ती गरफायदा घेऊन तुमच्याकडून फायदा उकळतील. नोकरीमध्ये वरिष्ठ एखाद्या कामाची परवानगी देतील, असे गृहीत धरून ते काम परस्पर पूर्ण करू नका. नवीन नोकरीच्या कामात घाईने निर्णय घेऊ नका. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींचे विचार तुम्हाला पटणार नाहीत, पण त्यांनी तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, हे विसरू नका.

कन्या- एखादे छान स्वप्न तुम्ही उराशी बाळगले तर त्याची पूर्तता करणारे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात मात्र अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना ‘दिसते तसे नसते’ याची आठवण ठेवून सावध राहा. जोडधंद्यातून चांगला फायदा मिळेल. नोकरीमध्ये खास सवलतींकरिता तुमची निवड होईल. काहींना वरिष्ठांकडून परदेशी जाण्याचे संकेत मिळतील. घरामध्ये पूर्वी ठरलेले मंगलकार्य पार पडेल. त्यानिमित्त लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होईल. आवडत्या वस्तूंची खरेदी होईल.

तूळ- स्वप्न आणि सत्य यांमध्ये बराच फरक असतो, ही गोष्ट तुम्हाला कळते. पण वेळ आली की तुम्ही स्वप्नामागे धावता याचा विसर पडू देऊ नका. व्यवसाय-उद्योगात काहीतरी नवीन आणि सनसनाटी काम करावेसे वाटेल, परंतु ते करण्यापूर्वी तुमच्या आíथक आणि इतर मर्यादा लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या चांगल्या संधीकरिता वरिष्ठांनी तुमची निवड केल्याने तुम्ही हुरळून जाल. उलट दगदग, धावपळ मात्र वाढेल. घरामध्ये सर्वजण एखाद्या स्वप्नमयी कल्पनेत दंग असतील. नेहमीच्या कामांकडे थोडेसे दुर्लक्ष होईल.

वृश्चिक- जी संधी तुमच्यापुढे असते त्याचा कसा फायदा उठवायचा हे तुम्हाला सांगावे लागत नाही. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता एखादी योजना कार्यान्वित केली असेल तर त्यातून फायदा संभवतो. नोकरीमध्ये वरिष्ठांनी एखादी मागणी पूर्ण करायची असे आश्वासन दिले असेल तर त्याची पूर्तता होण्याची चिन्हे दिसू लागतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. घरामध्ये एखाद्या कार्याच्या निमित्ताने मित्रमंडळी आणि नातेवाईकांची गाठभेट होईल. त्यांच्याबरोबर वेळ मजेत जाईल.

धनू- निरभ्र आकाशात अचानक काळे ढग जमा झाल्याने जी परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार- उद्योगात अनपेक्षित खर्च वाढल्याने आíथक तणाव जाणवेल. नोकरीमध्ये खूप काम करूनही त्याचे श्रेय न मिळाल्याने तुमचा उत्साह कमी होईल. तरीपण कर्तव्य चुकणार नाही. घरामध्ये प्रत्येकजण तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवेल, पण तुमची गरज कोणीच लक्षात घेणार नाही. एखाद्या कारणाने बजेटबाहेर जाऊन पसे खर्च करावे लागतील.

मकर- प्रत्येक वेळी फक्त व्यवहारच उपयोगी पडत नाही, तर कधी कधी स्वत:च्या आनंदाचाही विचार करावा लागतो. तसा तुम्ही केलात तर आठवडा खऱ्या अर्थाने उपभोगू शकाल. व्यवसाय-उद्योगात स्वत:च्या मालाची किंवा सेवेची जाहिरात कशी करायची हे तुम्हाला माहीत असते. त्याचा फायदा घेऊन तुम्ही विक्री आणि नफ्याचे प्रमाण वाढवू शकाल. नोकरीतील कामाच्या निमित्ताने एखादी विशेष सवलत तुमच्या वाटय़ाला येईल. घरातील सदस्यांबरोबर पूर्वी ठरलेले लांबच्या प्रवासाचे किंवा इतर कार्यक्रम पार पडतील.
कुंभ अनेक कामे एकाच वेळी तुमच्या मनामध्ये असतील. त्यामुळे नेमके कोणत्या कामाला आणि किती महत्त्व द्यावे, असा तुमच्यापुढे प्रश्न पडेल. व्यवसाय-उद्योगात ज्या गोष्टींकडे गेल्या १-२ आठवडय़ांत तुमच्या हातून दुर्लक्ष झाले होते त्यातल्या त्रुटी समजल्यामुळे त्यावर तुम्ही ताबडतोब लक्ष केंद्रित कराल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही मन लावून काम कराल. पण वरिष्ठांचे समाधान होणे अवघड आहे. एका वेळी फक्त एकच काम हाताळा. घरामध्ये एखाद्या जुन्या वादग्रस्त प्रश्नावर उलटसुलट चर्चा होईल.

मीन- अनेक वेळा असे होते की, तुम्ही ठरवून दिलेले काम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडता, परंतु तुमच्या राशीत व्यावहारिक लबाडी नसल्यामुळे या सगळ्याचे श्रेय स्वार्थी व्यक्ती घेतात. व्यापार-उद्योगात आíथक बाबींना प्राधान्य द्या. नोकरीमध्ये आधी केले मग सांगितले. असे धोरण तुम्ही ठेवले तर त्यातून तुमचाच फायदा होईल. घरामध्ये कोणाच्याही बोलण्याकडे जास्त लक्ष न देता तुमचे अंतर्मन जे सांगेल त्यावर विश्वास ठेवा.