नाटक, चित्रपट, संगीत या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या कलावंतांच्या मुलाखतींचं हे पुस्तक. यात लता-आशा-उषा-हृदयनाथ मंगेशकर, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, मकंरद अनासपुरे, शर्वरी जमेनीस, देवकी पंडित, चित्तरंजन कोल्हटकर अशा एकंदर अठरा कलावंतांचा समावेश आहे. या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही, त्यामुळे वाचकांची थोडीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पण लेखिकेने आपल्यापरीने व्यवस्थित तयारी करून मुलाखती घेतल्या आहेत. शिवाय त्या प्रश्न-उत्तर या नेहमीच्या पद्धतीने दिल्या नाहीत.  अर्थात या कलावंतांच्या मुलाखती सततच कुठे ना कुठे प्रकाशित होत असतात. त्यामुळे या पुस्तकातून परिचित झालेली माहितीच पुन्हा वाचायला मिळते. पण तरीही हे पुस्तक वाचनीय झालं आहे.
‘नामांकित’ – डॉ. अनघा केसकर, विजय प्रकाशन, नागपूर,  पृष्ठे – २०१, मूल्य – २२० रुपये.