‘‘सुप्रभात आत्या!’’
‘‘सुप्रभात मैत्रेय! आज तुला सकाळी सकाळी व्हॉटस्अ‍ॅपवर आत्या कशी काय दिसली? मित्र-मैत्रिणी गायब आहेत की काय तुझे?’’
‘‘कमॉन आत्या. मी तुझ्याशी नेहमीच गप्पा मारतो. तूच नसतेस सकाळी.’’
‘‘कसा आहेस? अभ्यास ठीक चालू आहे ना? होस्टेलवरचं जेवण रुचायला लागलं की नाही? तब्बेत कशी आहे?’’
‘‘आत्या, अगं पाच महिने झालेत मला होस्टेलवर येऊन. जेवण केलंय Adjust पण तब्बेतीचं म्हणशील तर जरा Problemआहे.’’
‘‘म्हणून आत्याची आठवण झालीय तर! बोल बोल..’’
‘‘गेल्या दोन महिन्यांपासून सर्दीचा आणि अपचनाचा त्रास होतोय.’’
‘‘थंडपेयं पितोयस ना नियमित?’’
‘‘अरे यार! आईनं चुगली केलेली दिसतेय लगेच. तिनं ना ठरवूनच टाकलंय की मला जे काही होतंय ते सॉफ्ट ड्रिंक्समुळे.’’
‘‘मग तुला काय वाटतं? आईला काही कळत नाही?’’
‘‘तसं मी कुठे म्हटलंय? पण ती काही ऐकूनच घेत नाही.’’
‘‘काय ऐकून घ्यायचंय? बोल. मी घेते ऐकून.’’
‘‘अगं इथे होस्टेलवरचं पाणी इतकं मचूळ चवीचं आहे ना? पिववतच नाही. आमचं इथे मेस कम कॅन्टिन आहे. मग जेवताना आम्ही सगळेजण शीतपेय पिणं पसंत करतो. बरं वाटतं. त्यामुळे जेवणही जातं.’’
‘‘रोज? तीनही वेळच्या खाण्याबरोबर?’’
‘‘हो. तहान तर लागतेच ना?’’
‘‘बाटलीबंद पाणी का नाही पीत बरं?’’
‘‘तेही इथेच कुठेतरी भरलेलं असतं. तीच चव. सीलबंद नसतं कधीकधी. शीतपेयांच्या बाटल्या बंद असतात. ते आपलं लो कॅलरी, र्निजतुक आणि हायजिनिक म्हणून घेतो.’’
‘‘कुणी सांगितलं तुला हे सगळं?’’
‘‘कुणी कशाला सांगायला पाहिजे? कॉमन सेन्स असतो ना? मित्रही म्हणतात.’’
‘‘मैत्रेय, मागे एकदा तुला तुझ्या आईनं तूप खायचा आग्रह केला होता, आठवतं? तेव्हा तू मारे ऐटीत, नेटवरून तुपाची सगळी माहिती काढून आईला दाखवली होतीस. यावेळी थंड पेयांविषयी अशी काही माहिती काढलीस कारे? नाही, म्हणजे तुम्ही विज्ञानवादी युवक! तुम्हाला पुरावे लागतात सगळे. म्हणून आपलं विचारलं..’’
‘‘इतके सगळे लोक पितात की गं जगभरात! शिवाय ही पेयं प्यायल्यावर फ्रेश वाटतं. सध्या तीच soft drinks आहेत. (?!!?) तुमचं उगीच काहीतरी. माझ्या मित्रांच्या तर घरातसुद्धा फ्रीजमध्ये soft drinksच्या मोठय़ा बाटल्या असतात. स्वस्त पडतात. मित्र म्हणतात- पाहुण्यांनाही आम्ही हेच देतो. जेवतानाही घेतो. आपल्याकडे ना, बंधनच फार!! सगळे जुनाट विचार..’’
‘‘अरे, माझी ऑस्ट्रेलियात राहणारी एक मैत्रीण मला परवा सांगत होती की त्यांच्याकडे म्हणे एक नवीन शोध लागलाय.’’
‘‘काय?’’
‘‘तहान लागल्यावर पिण्यासाठी सर्वात उत्तम पेय म्हणजे पाणी.’’
‘‘मग? पाश्चात्त्यांकडे संशोधन चालूच असतं सतत.’’
‘‘अरे मंद मुला, तू माणूस आहेस का संशोधक?’’
‘‘का? काय झालं?!’’
‘‘अरे तहान लागल्यावर पाणी पिणं ही आम्हा जुन्या भारतीयांची नैसर्गिक ऊर्मी आहे. किंबहुना प्रत्येक मनुष्यप्राण्याची ती तशीच असते, असायला हवी. यात काय संशोधन करायचं कोटय़वधी रुपये खर्चून?’’
‘‘पण इथल्या पाण्याचा काहीच भरवसा नाही. शुद्ध तरी करतात की नाही काय माहीत? त्यापेक्षा ही शीतपेयं निदान germ treeतरी असतात.’’
‘‘germ tree?!! शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये अधूनमधून मेलेली पाल, झुरळ, लोखंडी खिळा, गुटख्याचं पाकीट, कचरा असं काय वाट्टेल ते सापडत असतं. हे germ tree?!’’
‘‘This is too much aatya. These are accidents yaar.’’
‘‘हद्द झाली तुझी. अपघात काय लेका? इथल्या एखाद्या सरबतवाल्याच्या किंवा लस्सीवाल्याच्या पेल्यात जर तुला माशी सापडली, तर त्याला तुझ्या याaccident संकल्पनेचा फायदा देशील का रे तू? तेव्हा मात्र लगेच म्हणशील-‘भारतीयांना हायजिनचा विचारच करता येत नाही. परदेशात फूड प्रोडक्ट्सची किती काळजी घेतली जाते..वगैरे.’’
 ‘‘पण ते खरं आहे ना?’’
‘‘कुणी सांगितलं?’’
‘‘हो, तिथले नियम खूप कडक असतात.’’
‘‘तू स्वत: जाऊन बघितलं आहेस? या शीतपेयांच्या विरोधात अमेरिकेत एक अहवाल तयार झाला होता. पण या क्षेत्रातल्या फार मोठय़ा आर्थिक गुंतवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होईल म्हणून तो प्रकाशातच येऊ दिला नाही तेव्हा!- हे माहीत आहे का तुला! अरे घरोघरी मातीच्या चुली..’’
‘‘ती त्यांची आर्थिक विकासाची धोरणं असतील ना?’’
‘‘कुणाचा आर्थिक विकास? एक-दोन बडय़ा उद्योजकांचा? तोही सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा बळी देऊन? हे आपल्याकडे घडलं असतं तर तुम्ही त्याला ‘भ्रष्टाचार’ म्हटलं असतं की रे! म्हणजे ‘अमेरिकेचा तो बाब्या आणि भारताचं ते कार्ट’- अशी नवी म्हण बनवायला हवी.’’
‘‘बापरे! तू तर आईपेक्षाही जहाल निघालीस.’’
‘‘खोटं बोलत्येय का?’’
‘‘मग आता तूच सांग, या पेयांमध्ये काय असतं ते.’’
‘‘अब आया ऊँट पहाड के नीचे।’’
‘‘तसा तो तू नेहमीच आणतेस.. सांग आता.’’
‘‘शीतपेयांचे मुख्य दोन प्रकार असतात. फसफसणारी आणि न फसफसणारी.’’
‘‘आम्हाला फसफसणारी जास्त आवडतात.’’
‘‘त्यात पाण्यात CO2 मिसळलेला असतो.’’
‘‘त्यासाठी पाण्यात आधी असलेले वायू काढावे लागत असतील ना?’’
‘‘हो. म्हणजे पाण्यातला O2 काढून CO2 भरतात. हा कार्बन डायऑक्साइड शरीराला किती घातक असतो हे मी वेगळं सांगायला नको ना?’’
‘‘नको.. पुढे?’’
‘‘शीतपेयांमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे पोटात कृमी होतात, दात किडतात, वजन वाढतं, भूक कमी होते. पोषण मात्र अजिबात मिळत नाही.’’
‘‘काही शीतपेयांमध्ये साखरेऐवजी sweetners वापरतात गं आत्या. म्हणून तर ते लो कॅलरी होतात ना?’’
‘‘sweetnersतर जास्त घातक! शेवटी ती केमिकल्सच की! सॅकरीन किंवा अ‍ॅस्परमेट ही कर्करोगाला कारण ठरतात. सध्या जास्त वापरलं जाणारं sweetners म्हणजे हाय फ्रूक्टोज कॉर्न सिरप (HFCS) हे तर रक्तदाब, स्थौल्य, जीवनसत्त्वांची/खनिजांची कमतरता, यकृताचे आजार, कर्करोग, हृदयरोग, संधीविकृती, triglycerideची वाढ यांना कारण ठरतं.’’
‘‘आत्या, ज्यादा हो रहा है.. ज्यादा हो रहा है! थोडं कमी ये ना!’’
‘‘कमी? मग आणखी ऐक.. ही पेयं अम्लधर्मी (acidic)आणि तीक्ष्ण असतात. आपल्या दातांवरचं enamel हे पांढरं कवच यात सहज विरघळतं. इतकंच काय-आंत्रांमध्ये आत असलेलंmucous membrane हे सुरक्षा कवचही त्यात विरघळतं आणि आंत्र आतून सोलवटल्यासारखं होतं. यात हाडं, दात विरघळू शकतात. लोखंडाचा गंज काढायला, टॉयलेट स्वच्छ करायला याचा उत्तम उपयोग होतो.’’
‘‘काय सांगतेस? हे पितो आम्ही?’’
‘‘यातल्या फॉस्फोरिक अ‍ॅसिडमुळे हाडं आणि दात ठिसूळ होतात.’’
 ‘‘आत्या, पुरे की. किती बुराई करशील?’’
‘‘हे तर काहीच नाही! बऱ्याच शीतपेयांमध्ये कीटकनाशकांचेही अंश आढळतात. ते किती प्रमाणात? तर आपल्याकडे हैद्राबाद आणि छत्तीसगढ भागातले काही शेतकरी, या शीतपेयांचा, पिकांवर कीटकनाशकांसारखा फवारा मारतात. स्वस्तात मस्त..’’
‘‘पोटात काय थैमान घालत असतील ही पेयं?’’
‘‘घालतातच! पोट सततacidic राहतं. इतकं करून यातले घटक पचनाला मदत न करता, पचन कमीच करतात. त्यामुळे भूकही कमी होते. अन्न अंगी लागत नाही. आंत्रांचंmucous membrane दुखावलं जातं. त्यामुळे पोटदुखी सुरू होते. और न जाने क्या क्या..’’ (भाग १)