तिला कामावर जाण्यासाठी उशीर झालेला आहे. रिक्षावाले काका तिची वाट पाहात उभे आहेत.. अशा आशयाच्या सुंदर भावगीताचे कर्णमधुर सूर कानावर
पडत आहेत.
मध्येच कोठून एक, दोन, तीन, चार असे पाढे म्हणणाऱ्या हमालपुऱ्यातील हुशार पोरांचे गाणे ऐकू येत आहे.
त्यातच कोणीतरी गोिवदरावांना त्यांच्या घरात पाणी नसून, घागर उताणी असल्याचे धगधगीत वास्तव
सांगत आहे.
तर पलीकडे कोणी सर्व नगरीमध्ये शोर मचला असून ‘बिरज का बाका’ आल्याची वर्दी देत घागरी जपण्याचा सल्ला देत आहे..
वातावरण कसे या महाडेसिबली गीतगोडव्याने भारून गेले आहे. गच्चीवरून हळूच कोण्या सुबक ठेंगणीने थोडे हसत, लाजत बादलीतील पाणी खाली गोिवदांवर भिरकावून द्यावे आणि भिर्रदिशी दाराच्या पडद्याआड जावे तशा हलक्याशा श्रावणसरी पडत आहेत. त्यात भिजून चिंब झालेल्या तनामनात आनंदाचे ढाकुमाकुम सुरू आहे. एकंदर काय, तर तंतोतंत ‘मोद विहरतो चोहीकडे’ असे झाले आहे.
आता अशा वेळी आपल्यासारख्या सामान्य माणसाने घरात झोपेच्या गोणी भरत बसणे बरे दिसते काय?
दहीकाल्याच्या या इव्हेंटात आपणही सामील व्हावे, चार पाणफवारे आपल्याही अंगावर पडावेत, गोिवदांचे थरावर थर, ते चढणे, ते कोसळणे, ते कोसळुनी पुनरपी चढणे, त्या सलाम्या देणे, झालेच तर स्टेजवरचे ते उत्सवमूर्ती, ते सत्कार सोहळे, त्या बॉलीवूडी बार्बी बाव्हल्या, त्या लावण्या, ते नृत्य.. अहाहा! हे सर्व पाहावे व त्या धार्मिक आनंदाने थरथरून जावे या मिषाने आम्ही मनोमनी बोलबजरंगबलीकीजै म्हणत श्रीस्थानक ठाण्याकडे निघालो.
जाता जाता आमचे परमस्नेही व कार्यसम्राट-ए-कळवा, दोस्त-ए-मुंब्रा बंटीदादा तथा जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांचे निवासस्थानी डोकावलो.
(मनीं म्हटले दादा सोबतीस असले म्हंजे बरे. अगदी स्टेजवर बसून अगदी जवळून नृत्यसंगीताचा परमानंद घेता येईल. तुम्हांस सांगतो, स्टेजवरच्या नटय़ा आणि स्टेडियममधले क्रिकेट पाहण्यात काडीचेही नेत्रसुख नसते. लांबून स्टेजवरची नटी आणि तिच्या सत्कारासाठी पुष्पगुच्छ घेऊन आलेली मंडळाची स्वयंसेविका दोन्हीही सारख्याच दिसतात!)
आत गेलो आणि पाहतो तो काय, दादा असे दोन्ही पाय छातीशी घेऊन खुर्चीवर बसलेले. केस विस्कटलेले, मिशा ओघळलेल्या. डोळ्यांत सुन्न, विमनस्क भाव!
मनीं म्हटले दादांना सर्दीपडसे झाले की काय? पण तसे असते तर एवढय़ात कार्यकर्त्यांनी कळव्या-मुंब््रय़ात ‘दादा, गेट वेल सून’ शुभेच्छुक- चिंटू, िपटू आणि राष्ट्रवादीचे समस्त कार्यकत्रे’ असे फ्लेक्स लावले असते.
तरीही आम्ही काळजीने विचारले, ‘दादा, बरं नाही
का वाटत?’
तसे ते उसळले. म्हणाले, ‘कसं वाटेल? बरं कसं वाटेल? इथं आमचा आवाज दाबला जातोय.’
बाप रे! म्हणजे दादांना खरोखरच सर्दी-पडसे झालेय की काय?
‘दादा, मग काही घेतलं का नाही तुम्ही? कमीत कमी मिठाच्या पाण्याने घसा तरी शेकवायचा. कसं करायचं माहितेय का, असं ना उनउन पाणी घ्यायचं. त्यात ना बचकभर मीठ टाकायचं आणि मग ना..’
‘तसं नाय वो! आमच्या घशाला काय नाय झालं. इथं परंपरेचा गळा घोटला जातोय!’
‘काय म्हणताय?’ आम्ही हादरलोच.
दादांच्या आवाजाला आता संतप्तकंप चढला होता. ते म्हणाले, ‘लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा, असा आदेश काढलाय. दहीहंडीची उंची कमी करा, असं म्हणतात. लहान मुलं वर चढवू नका, म्हणतात. परंपरा टिकवायच्या कशा आम्ही या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात? याविरोधात संघर्ष केलाच पाहिजे.’
बोलता बोलता ते विचारात गढले. मग हळूच पुटपुटले, ‘प्रॉब्लेम म्हातारी मेल्याचा नाही. काळ सोकावतो,
त्याचा आहे..’
आम्हांस काही समजेनाच. काळ सोकावतो? म्हणजे?
बऱ्याच वेळाने आमच्या मस्तकात सीएफेल
ल्याम्प पेटला.
लक्षात आले, की दहीहंडी आणि राजकीय पक्ष हे तसे सारखेच की!
राजकीय पक्षांतील मनोऱ्यांवर आज बरीच लहान लहान माणसे सलाम्या देताना दिसतात.
उद्या हाच निर्णय तेथेही लागू करायचा असे लोकांनी म्हटले, तर बंटीदादांसारख्या नेत्यांनी करायचे तरी काय?
त्यांच्या करिअरचा तर भाऊ दहीकालाच व्हायचा!    

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू