गेल्या तीन लेखांमधून आपण हवा किंवा वायूवरील दाब वापरून उपयोगात येत असलेली काही उपकरणे बघितली. दाबाचा उपयोग करून घरगुती वापरात असलेले आणखी एक उपकरण आज आपण पाहणार आहोत. ते म्हणजे अग्निशामक.
अग्निशामक समजून घेण्याआधी आपण अग्नी म्हणजे काय ते जरा जाणून घेऊ. कारण आग का लागते हे lok03कळले, तरच ती कशी विझवता येते हे कळेल. आग लागणे, ही ‘ज्वलन’ (Combustion) नावाने ओळखली जाणारी एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्वाला (flame) हा आगीचा आपल्याला दिसलेला आविष्कार असतो. कुठल्याही रासायनिक क्रियेप्रमाणे इथेही दोनपेक्षा अधिक गोष्टी एकत्र येऊन काही वेगळ्याच गोष्टी तयार करतात. ज्वलनामध्ये लाकूड, कागद, तेल, कोळसा (इंधन) यांसारख्या रासायनिक पदार्थाचा हवेतील प्राणवायूशी संयोग होऊन त्यापासून पाणी, कार्बन डाय ऑक्साइड, इतर वायू आणि उष्णता तयार होते. ज्वलन कधीही आपोआप सुरू होत नाही. नुसते तेल किंवा लाकूड हवेच्या सान्निध्यात असले, तरी जोपर्यंत बाहेरून क्षणिक औष्णिक ऊर्जा देणारी घटना (एखादा ठिणगी किंवा काडय़ापेटीतील जळती काडी) त्यांच्याजवळ येत नाहीlr07 तोपर्यंत ही रासायनिक प्रक्रिया सुरू होत नाही. आणि ही साखळी प्रक्रिया (chain reaction) एकदा सुरू झाली की, कुठलातरी एक घटक (इंधन, प्राणवायू किंवा उष्णता) संपेपर्यंत ज्वलन थांबत नाही.
इंधन (लाकूड, तेल, इ.), प्राणवायू आणि उष्णता हे तीनही घटक एकाच वेळी एकाच ठिकाणी  हजर असतील तरच आग लागू शकते. म्हणजेच जर आग विझवायची असेल, तर या रासायनिक प्रक्रियेतील कुठलाही एक घटक नियंत्रित करणे किंवा संपवणे गरजेचे ठरते. घरात तव्यावर किंवा कढईत कधी आग लागली तर आपण काय करतो? एकतर ते चुलीवरून उतरवतो, म्हणजेच उष्णता मिळणे थांबवतो. किंवा त्यावर एखादा जाड कपडा ठेवून त्यावर पाणी मारतो म्हणजेच त्याला प्राणवायू मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करतो आणि कापड ओले आणि गार ठेवून ते पेटणार lr10नाही याची काळजी घेतो. अग्निशामकाचे सर्व प्रकार याच तंत्रावर विकसित केलेले आहेत. ‘अग्नी त्रिकोण तोडणे आणि ज्वलनाची साखळी प्रक्रिया थांबवणे.’
कसा काम करतो अग्निशामक?
बहुतेक सर्व अग्निशामक हे दिसायला गोल डब्यासारखे, (आतील कुपी) धातूच्या जाड पत्र्यापासून बनवलेले असतात. यात दोन पदार्थ असतात. त्यातला एक हा घन, द्रव किंवा वायू स्वरूपातील अग्निविरोधक पदार्थ असतो तर दुसरा, कुपीमध्ये, उच्च दाबाखालील रासायनिक पदार्थ असतो, जो अग्निशामकाचा दांडा दाबल्यावर आतील अग्निविरोधक पदार्थ बाहेर फेकतो. lr05अग्निशामकाचे तीन प्रकार आहेत-
१. पाण्याचा उपयोग केलेले- या प्रकारात डब्यात बाहेरील बाजूस पाणी आणि उच्च दाबातील हवा असते. दट्टय़ा दाबल्याबरोबर आतील रासायनिक पदार्थ उच्च दाबाने बाहेर येतो आणि पाणी  आगीवर फेकण्यास आवश्यक दाब देतो. या प्रकारचे अग्निशामक प्रक्रियेतील उष्णता कमी करतात.
२. कोरडी रासायनिक पावडर किंवा फेस वापरलेल्या अग्निशामकामध्ये, उच्च दाबातील नायट्रोजन वायूमुळे ही पावडर किंवा फेस आगीवर फेकला जातो आणि त्याचा थर आगीवर पसरला की आगीला मिळणारा lr08 प्राणवायू बंद होतो आणि आग विझते.
३. कर्ब वायू असलेल्या अग्निशामकामध्ये कार्बन डाय ऑक्साइड (CO2) द्रव आणि वायुरूपात भरलेला असतो. सामान्य दाब आणि तापमानाखाली CO2 वायूरूपात असतो. त्याला उच्च दाबाखाली नेल्याने तो द्रव रूपात साठवलेला असतो. जेव्हा त्याच्यावरील दाब काढला जातो तेव्हा थंड असलेला हा वायू प्रसरण पावतो आणि आगीला वेढताना तो दोन प्रकारे आग विझवतो.. तापमान कमी करून आणि प्राणवायू कमी करून.
१. कडी- अपघाताने दांडा दाबला जाऊ  नये तसेच अग्निशामक वापरण्यायोग्य आहे हे या कडीमुळे कळते. कडी जाग्यावर नसेल किंवा तुटलेली असेल तर तो अग्निशामक तपासणे गरजेचे ठरते.
२. धातूच्या जड पत्र्याच्या डब्यातील लहान डबी / कुपी- यात उच्च दाबातील रसायन/ किंवा वायू असतो.
३. अग्निविरोधक पदार्थ- पाणी किंवा पावडर किंवा फेस.
४. बाहेरील बोंडाला (Nozzle) जोडणारी नळी.
५. बोंड- बहुतेक वेळा याला प्लास्टिकची नळी जोडतात, जी आगीच्या दिशेने सहज फिरवता येते.
६. अग्निशामक चालू करताना आपण ही कडी उचकटतो आणि दांडा दाबतो. lr09७. दांडा दाबल्याने झडप (चित्रामध्ये हिरव्या रंगात असलेली) उघडते आणि कुपीतील उच्च दाबातील रसायन/ वायू बाहेर येतो.
८. कुपीतील पदार्थ बाहेर आल्याबरोबर प्रसारण पावतो आणि बाहेरील भागातील पदार्थावर/ पाण्यावर दाब देतो आणि त्याला खाली दाबायला लागतो.
९. खाली दाबल्याबरोबर तो पदार्थ/ पाणी नळीमध्ये वर चढते.
१०. पाणी/ पदार्थ/ वायू बोंडातून बाहेर येते आणि आगीच्या दिशेने फेकले जाते.
अग्निशामक वापरताना तो योग्य प्रकारचा असणे गरजेचे आहे. त्याचा तक्ता पुढे दिला आहे.
आगीसारख्या आणीबाणीच्या वेळी आग शांत करण्याकरता, आपले डोके शांत ठेवून अग्निशामक योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे.   

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Raj thackeray amit shah deepak kesrkar
मनसेचं ‘इंजिन’ यार्डात जाणार? दीपक केसरकर म्हणाले, “महायुतीने राज ठाकरेंना दिलेल्या प्रस्तावानुसार…”
BMC Recruitment 2024 application date
BMC Recruitment 2024 : ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेत’ नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकतात अर्ज….
जीप..  कालची आजची..