12वि ख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे एक विधान नुकतेच वाचनात आले. ते म्हणतात, ‘‘मला तंत्रज्ञानामुळे माणसांचे एकमेकांतील आदानप्रदान बंद होण्याच्या दिवसाची भीती वाटते, (तेव्हा) जगात **ची पिढी असेल.’’ दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसते. तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे असे म्हणतानाच जवळच्या माणसांबरोबरच संवाद होत नसल्याचे जाणवते. ही परिस्थिती का आली असावी याची अनेक कारणे असतील. सामाजिक/सांस्कृतिक बदलांचे अपरिहार्य परिणाम असतील, पण या परिस्थितीचे भौतिक कारण बहुमताने मान्य होण्यासारखे आहे, ते म्हणजे भ्रमणध्वनी. अक्षरश: शरीराचा एक अतिरिक्त अवयव असल्यासारखे हे यंत्र आपल्या जगण्याचा भाग झाले आहे. आज जगात किती भ्रमणध्वनी संच आहेत याचा अचूक आकडा सांगणे अशक्य आहे. कुठल्याही आर्थिक स्तरापर्यंत पोचलेले हे तंत्रज्ञान, त्याच्या सर्वव्यापी उपयुक्ततेमुळेच आणि हाताळण्याच्या सोपेपणामुळे लोकाभिमुख झाले आहे.
दूरध्वनीला मागे टाकून आपले साम्राज्य जगभर पसरविणारा भ्रमणध्वनी लोकप्रिय होण्याची मुख्य दोन कारणे आहेत.
१. गती- दूरध्वनीमार्फत होणारा संवाद तारांमधून होत असतो, तर भ्रमणध्वनीमधून होणारे दळणवळण रेडिओ सूक्ष्मलहरींच्या माध्यमातून होत असल्याने त्याला लागणारा वेळ अतिशय अल्प असतो. बिनतारी यंत्रणेतून प्रवास करणाऱ्या या लहरी प्रकाशाच्या वेगाने (सुमारे ३,००,००० कि. मी प्रतिसेकंद) प्रवास करतात.
8२. किंमत- तंत्रज्ञान अतिशय कमी खर्चात काम करत असल्याने अत्यल्प दराने आपण जगात कुठेही संपर्क साधू शकतो. अशा या बहुगुणी रेडिओ संदेशवहनाचा सुरुवातीचा प्रयोग झाला तो १९०६ मध्ये. रेगिनाल्ड फेसेन्डेनने अमेरिकेतील मॅसेचुसेट्समधील ब्रँट गावातून, ११ मैल दूर अटलांटिक महासागरातील एका जहाजावर पहिला आवाजी रेडिओ संदेश पाठवला. त्यानंतर १९४० पर्यंत रेडिओ संदेशांचा वापर आणीबाणीच्या सेवा आणि टॅक्सी सेवांमध्ये सुरू झाला. १९४६ मध्ये अ ळ&ळ कंपनीने वाहनांमध्ये वापरता येईल अशी व्यवस्था वापरात आणली, तर १९६० मध्ये बेल प्रयोगशाळेने रेल्वेमध्ये भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध करून दिली. ४ एप्रिल १९७३ मध्ये मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपरने पहिला भ्रमणध्वनी संवाद केला आणि त्यालाच १९७५ मध्ये या शोधाचे स्वामित्व हक्क दिले गेले. त्याने वापरलेली प्रणाली चित्र क्र. १ मध्ये दिली आहे.
१९८२ मध्ये युरोपातील दूरध्वनी कंपन्यांनी एकत्र येऊन जगभर भ्रमणध्वनी वापरण्यायोग्य अशी प्रणाली तयार केली (Global System  for Mobiles-GSM). १९८४ मध्ये मोटोरोलाने पहिला भ्रमणध्वनी संच बाजारात आणला आणि त्यानंतर त्यात असंख्य बदल, सुधारणा होत गेल्या आणि आजही होत आहेत.
काम सारखेच असले तरी दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीच्या तंत्रात मूलभूत फरक आहे. दूरध्वनीचे संदेश तारा, बटणे, उपग्रह, टेलिफोन कार्यालये या सगळ्या जडजंबालातून प्रवास करतात तर भ्रमणध्वनीचे तंत्र विद्युत चुंबकीय 9रेडिओ लहरी वापरून संदेश वहन करते.
आपण जेव्हा भ्रमणध्वनी संचामध्ये बोलतो तेव्हा प्रथम ध्वनीलहरींचे विद्युत संकेतांमध्ये रूपांतर होते. संचातील एक सूक्ष्म चकती (Micro Chip) या संकेतांचे संख्यात्मक साखळीमध्ये रूपांतर करते. ह्या संख्यात्मक साखळीचे रेडिओ लहरी रूप (Digital Waves) रेडिओ लहरीच्या स्वरूपात संचामधून बाहेर पडते. प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या या लहरी सगळ्यात जवळचे भ्रमणध्वनीचे ग्रहणस्थान (cellphone mast) गाठतात. ग्रहणस्थानातून या लहरी नजीकच्या स्थानकाकडे (Base station)  पोचवल्या जातात आणि तिथून अवकाशात सोडल्या जातात. ईप्सित स्थळाजवळील स्थानक या लहरी ग्रहण करते आणि योग्य त्या संचापर्यंत पोचवते.
ठरावीक वारंवारितेच्या लहरी वापरून चालणारे वॉकी टॉकी संच फक्त त्याच लहरी पकडू शकतात आणि प्रक्षेपित करू शकतात. भ्रमणध्वनी संचामध्ये रेडिओ प्रक्षेपक (Transmiter)  आणि ग्राहक (Receiver) असतात, ते रेडिओ लहरींचे आदानप्रदान करतात. या लहरींची वारंवारिता कमी असल्याने त्यांच्याकडे फक्त जवळच्या ग्रहणस्थानापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक तेवढीच शक्ती असते. चित्र क्र. २ मध्ये दिसणारे ग्रहणस्थान वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या कमी शक्तीच्या लहरी ग्रहण करून उच्च शक्तिशाली अँटेनामार्फत या लहरी पुढे पाठवण्याचे काम करते. प्रत्येक संचामधून येणाऱ्या लहरींच्या वारंवारितेमध्ये थोडातरी फरक असला तरच त्या एकमेकांत न मिसळता पाहिजे तिथेच पोचतील. पण लक्षावधी लोकांना अशा वेगवेगळ्या वारंवारिता ठरवून देणे अशक्यप्राय आहे. याच्यावर उपाय म्हणून शहरांचे ठरावीक वारंवारिता संच (Set of frequencies) निश्चित केलेले षटकोनी खण (Cell)  पाडतात. प्रत्येक खणामध्ये ग्रहणस्थाने आणि स्थानक असते, जे त्या त्या खणात येणारे आणि जाणारे संदेश हाताळतात. या खणांची रचना दाखवणारे संकल्पनाचित्र चित्र क्र. ३ मध्ये दाखवले आहे.
A  खणातील संच आणि B  खणातील संच यांच्यात संवाद होत असताना तो खण A  च्या ग्रहणस्थान A स्थानक B- ग्रहणस्थान अशा मार्गाने होतो.
चित्रात दाखवलेली गाडी जर खण C,D  आणि E  मध्ये फिरत असताना गाडीतील माणसाला जर कुणाशी बोलायचे असेल, तर त्याला निर्विघ्नपणे बोलता येण्यासाठी त्याच्या  भ्रमणध्वनीचा संपर्क असणारे ग्रहणस्थान आपोआप बदलत जाते. कारण संचामध्ये सगळ्यात जवळचे ग्रहणस्थान शोधण्याची यंत्रणा कार्यान्वित असते. संचातून बाहेर पडणाऱ्या लहरींची ताकद मर्यादित असल्याने जर आपला संच जवळच्या ग्रहणस्थानाच्या कक्षेबाहेर गेला आणि जवळ दुसरे ग्रहणस्थान नसेल तर आपला संवाद तुटतो.
आपण सध्या वापरत असलेले भ्रमणध्वनी संच हे शब्दश: छोटे संगणक म्हणूनच काम करतात. तंत्रज्ञान रोज नवीन पर्याय आपल्यापुढे आणत आहे. ‘‘जो जे वांछील तो ते लाहो’’अशा परिस्थितीत तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आणि आपण त्याच्या आहारी किती जायचे, हे तारतम्य बाळगणे हेच महत्त्वाचे.
dpdeodhar@gmail.com

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी