‘मे महिन्यात सोने २० हजार रुपये तोळा होणार. सध्या काही सोने घ्यायची गरज नाही. मे महिन्यात लग्नाआधी दोन-तीन आठवडे खरेदी करू. सोन्यासाठी जमवलेले पसे सध्या शेअर्समध्ये गुंतवू, मे महिन्यापर्यंत बाजार वर जाणार तेव्हा शेअर्स वरच्या भावाला विकून त्याच पशातून सोन्याची खरेदी करू.’ lok06पाटील यांची ही भन्नाट योजना ऐकून मी गार पडले. इतके जबरदस्त गुंतवणूक नियोजन मला तरी शक्य नाही.
चढणारा बाजार आणि कोसळणारे सोने यामुळे अशी योजना आखणारे अनेक जण आज आपल्याला दिसून येतील. २००८ च्या जानेवारी महिन्यात सर्वाना शेअर्समध्ये पसे गुंतवायचे होते, तर २००८ च्या अखेरीस सर्वाना शेअर बाजार नकोसा झाला होता. बाजाराच्या हेलकाव्यांबरोबर मानवी मनेदेखील तेवढीच दोलायमान असतात. किंमत वर जात असेल तरी एखाद्या वस्तूच्या किंवा मालमत्ता प्रवर्गाच्या मागे फार लागू नये. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हेच खरे.
एखादा असेट क्लास लोकांना नकोसा असतो तेव्हा तो थोडासा का होईना, पण जरूर खरेदी करून ठेवावा. आणि जेव्हा एखादा असेट क्लास सर्वाना हवाहवासा वाटू लागतो तेव्हा तो थोडा का होईना जरूर विकावा, असे आमचे गुंतवणूक शिक्षक अशोक कुमार सर नेहमी सांगत असत. गेल्या दहा वर्षांत याची प्रचीती अनेकदा आली आहे. अगदी गेल्या वर्षांतील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे उदाहरण घेऊ या. एक वर्षांपूर्वी फार थोडे लोक शेअर बाजाराकडे ओढले जात होते. शेअर बाजारात पसे गुंतवावेत असे म्हटले की, बहुतांश मंडळी पाच वर्षांचे शेअर बाजाराचे उत्पन्न आणि बँकेच्या मुदत ठेवीचे उत्पन्न समान आहेत, असे म्हणून शेअर बाजार म्हणजे कसा जुगार आहे, वगरे मुद्दे मांडत. आज मात्र शेअर बाजारात पसे गुंतवायला येणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढली आहे. २००८ च्या जानेवारीइतकी छान परिस्थिती नसली तरी निश्चितच सुधारणा आहे. पण ही परिस्थिती अशीच राहील का?
२०१५ हे वर्ष बाजाराला एक चांगला मजबूत पाया देईल. ‘निफ्टी’ पुढील वर्षी १० ते १२ टक्के उत्पन्न देऊन जाईल, असे म्हटले तर ऐकणारे आश्चर्यचकित होतात. ‘गेल्या एका वर्षांत ‘निफ्टी’ने ३५ टक्के, तर मिड कॅप फंडांनी १०० टक्के उत्पन्न दिले आहे. ‘तुम्ही तर शेअर बाजारवाल्या आहात. आम्हाला वाटले की तुम्ही १०० टक्के किंवा किमान ५० टक्के उत्पन्न असे म्हणाल..’ अशी एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकू येते. एखादी गोष्ट वर जाऊ लागली की तिला अंत नाही आणि एखादी गोष्ट खाली येऊ लागली की ती मातीमोल झाल्याशिवाय थांबणार नाही, याची लोकांना इतकी खात्री का वाटते हे मला काही कळत नाही. एखादे झाड कितीही उंच वाढले तरी ते आकाशाला टेकत नाही, हेच वैश्विक सत्य आहे.
सोने पडत असेल तर ‘गोल्ड ईटीएफ’च्या माध्यमातून गुंतवणूक म्हणून खरेदी करायला आकर्षक वाटते. शेअर बाजार उद्याच कोसळून अर्धा होईल असे वाटत नसले तरी पुढील वर्षभरात आवश्यक असणारे पसे बाजारात गुंतवू नयेत, एवढा विवेक आपण बाळगणे आवश्यक आहे. पुढील वर्षी घरात एखादे लग्न असेल, मुलांच्या फीचे पसे जमवून ठेवले असतील तर त्याचा उपयोग तर्काधिष्ठित गुंतवणुकीसाठी (२स्र्ीू४’ं३्रल्ल) करू नये. सध्या बाजारात येणारी अनेक मंडळी पुढील वर्षी आम्ही बाजारातून ५० टक्के उत्पन्न घेऊन जाणार, अशा मनोभूमिकेतून येत आहेत.
पण खरेच ते इतके सोपे आहे का? अलीकडेच काही माध्यमांमधून ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’बद्दल फारच चांगली ‘टाग्रेट’ जाहीर करण्यात आली. पण याच मंडळींनी २००७ साली केलेली भाकिते आणि २००८ मध्ये कोसळलेला बाजार आज विसरून चालणार नाही. पुढील वर्षी काही बाजार कोसळणार नाही. कदाचित २००७ साली केलेली भाकिते २०१६ मध्ये खरी होतील. पण त्यापासून २००८ मधील पडझडीत घरी गेलेल्या गुंतवणूकदारांना काही फायदा होणार नाही. बाजारातील दोलायमानता आपल्या हाती नसते. गेल्या दहा वर्षांचा एक आढावा म्हणून हे कोष्टक दिले आहे. यावर्षीचे उत्पन्न बघून पुढील वर्षीच्या उत्पन्नाचा आडाखा बांधणे किती धोक्याचे ठरू शकते, हे या आकडेवारीकडे बघून कळेल.
या कोष्टकाकडे बघून एकच गोष्ट समजते- महागाई हा एक घटक रोख आणि व्याज देऊ करणाऱ्या गुंतवणूकांना चीतपट करून गेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर महागाईला हरवायचे असेल तर शेअर्स आणि सोने या दोन्हींमध्ये गुंतवणूक करायला हवी. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरता पसे गुंतवणे शक्य असेल तरच शेअर्समध्ये पसे गुंतवावेत. सोने पडत असताना त्यात थोडी थोडी खरेदी करत राहावी. पुढील वर्षी काही कारणाने बाजारात अस्थिरता निर्माण झाली तर सोने मदतीचा हात देऊन पोर्टफोलिओला थोडीफार स्थिरता देऊ शकते. दीर्घ मुदतीत शेअर्स निश्चितच चांगले उत्पन्न देऊ शकतात. पण अल्पकालीन अस्थिरतेत गुंतवणूकदार तगून राहिला तरच! त्यामुळे शेअर बाजार चांगला चालू असताना थोडे थोडे सोने पोर्टफोलिओचा विमा म्हणून जरूर विकत घ्यावे. शेअरबाजार कोसळताना सोने बहुतांशी वधारते. (कोष्टक पाहा). शेअर बाजारात वाजवी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा घेऊन जरूर एसआयपी करा, पण अवाजवी हावेपोटी बाजारात येणे टाळा. कोसळणाऱ्या सोन्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.