गा.. दगा.. बाला, घात झाला रे घात..! आठ कॉलमांच्या पवित्र शब्दमंदिरातील ब्रॉडशिट वृत्तभरव आम्ही! ज्यांच्या लेखणीच्या एका फटकाऱ्याने अवघे पृथ्वीमंडल डलमलते, ज्यांच्या एका वृत्तधमकीने भल्याभल्यांच्या उदरात डचमलते, ते या पत्रसृष्टीचे शिलेदार, बाहुबली बातमीदार आम्ही!
आणि च्यामारी, आज आमुच्यावरच आसा टाइम यावा?
ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी, त्यांनीच एका किरकोल बातमीने आमच्या विश्वव्यापी विश्वासार्हतेचा गला कापावा?
ज्यांनी आमच्या पिचल्या पाठकण्यास सादर आधार व्हावे, त्यांनीच आमच्या पाठीमध्ये बदनामीचा खंजीर खुपसावा?
आमच्या या वेदनेस खदाखदा हसणाऱ्या स्वर्गस्थ पत्रपितरांनो, ज्यांच्या नावे आम्ही पुरस्कारतो स्वत:स
त्या तमाम टिळकांनो, आगरकरांनो,
कुण्या पत्रपरिषदेत मिळालेल्या या बॉलपॉइंटी पेनाची शप्पथ सांगतो,
ते कसबी हात असते कोणा काका-पुतण्याचे, सहोदर वा चुलतबंधूचे, तर आम्हांस काहीही वाटले नसते.
सुपातले तेलकट वडे असे समजून ते अश्लील आरोप आम्ही नित्यसवयीने गिलून टाकले असते!
पण कुऱ्हाडीचा दांडाच गोतास काल व्हावा? पुरवणीनेच पेपर बुडवावा?
आमच्याच व्यवसायबंधूंनी आमच्यावर असा आरोप करावा?
आमच्या कालजाच्या कुहरावर, अन् त्याहून अधिक वेदनादायी म्हणजे आमच्या खमिसाच्या खिशावर आघात करावा?
आम्हांस पाकीटबाज पत्रकार म्हणावे?
‘पेड’गावचे शहाणे म्हणोनी हिणवावे?
काय हा दैवदुर्वलिास!
तेबी ऐन निवडणूक सनातच सगला इस्वासघात!
या अथांग विश्वाच्या इिम्पट्र लाइनमध्ये ज्याच्या नावावर लागलेला असतो वैश्विक पीआरबीचा स्टार,
त्या तुमच्या-आमच्या सर्वाच्या मास्टहेडमध्ये बसलेल्या दयाघन परमेश्वरास स्मरून सांगा,
आमचे नेमके काय चुकले?
एक छोटासा पाच हजारांचा पाकीटच घेतला ना आम्ही?
सदनिका, मदनिका तर नाही ना उचलली?
पत्रकार परिषदेत वाढलेल्या ताटातील बचकभर काजू उचलावेत त्या प्रकारे कोणी उचलते कोटय़ातील सदनिका हव्या तशा,
उंची हाटेलात कॉकटेलनंतरच्या डिनरात कोणी चापते श्रीखंडाऐवजी भूखंड वचावचा,
असे तर अपकृत्य नाही ना केले आम्ही?
मग त्याची एवढी बातमी प्रथमपृष्ठी छापण्याचे काय कारण होते?
असे तुमच्या विश्वासार्हतेचे कोणते ट्विन्टॉवर कोसलले आमच्या पाचहजारी मनसबदारीने?
खबरदार!
थोर परंपरेच्या कर्दमात लोलणाऱ्यांनो, माध्यमांच्या विश्वासार्हतेला आम्ही कलंक लावला असे म्हणाल, तर तेथल्या तेथे फेसबुकवर जाऊन काले फासू तुमच्या तोंडाला!
आम्हांस विश्वासार्हतेची पर्वा नसती तर दिवसाढवल्या मोठय़ा विश्वासाने आम्ही ते पाकीट घेतले नसते रांगा लावून!
आम्हांस माध्यमांच्या निरपेक्षतेची फिकीर नसती तर सगल्याच पक्षांकडून आम्ही ते पाकीट घेतले नसते निर्लज्ज निरपेक्ष हसून!
पण हे मिणमिणत्या पणत्यांनो,
आज पाचहजारी मनसबदार असलो, तरी उद्याचे तलपते पत्रसूर्य आहोत आम्ही!
आम्ही का गावी तुमच्यासमोर ही कैफियतीची कहाणी?
नाही, सरकार, नाही!
असे कितीही विश्वासघात केले या नतिकतेच्या पानांवर रांगणाऱ्या क्षुद्र व्यवसायद्रोह्यांनी,
तरी आता आमच्या डोल्यांत पानी येनार नाही!
आणि सरकार, तुमची शप्पथ सांगतो.. तोंडाला सुटलेले पानी कधी कमी होनार नाही!!