संजीव चांदोरकर यांनी ‘उत्तरं आपल्या जमिनीतून उगवावी’ (८ मार्च) या भूमी अधिग्रहण विधेयकारवरील लेखात, मोदी सरकारच्या वटहुकूमाला होणाऱ्या विरोधाची दोन कारणे lok03सांगताना एका मोठय़ा कारणाचा उल्लेख राहून गेला असावा असे वाटते.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विकासाबद्दल लोकांना उत्साह होता. औत्सुक्य होते. मुख्य म्हणजे या विकासाचे दुष्परिणाम काय आहेत, हे लोकांच्या अनुभवाला आले नसल्याने ते त्याबद्दल अनभिज्ञ होते.
आज खेडेगावातला सामान्य माणूससुद्धा याबाबतीत अतिशय जागरूक आहे. अनेक विकासग्रस्तांची नंतर झालेली परवड तो प्रत्यक्ष पाहत आहे. तसेच सार्वजनिक प्रकल्पांमध्ये खाजगी भांडवलाला जनतेच्या भल्यासाठी कसं राबवून घ्यायचे, हा कळीचा मुद्दा तो राबविणाऱ्या स्वार्थ सुटला तरच सुटेल. लाचलुचपत बंद झाली तर सर्वच प्रश्न सुटतील. कोणताही कायदा हा दंडसत्तेला काही अधिकार देत असतो हे खरे, पण ते अधिकार दोषींना शासन करण्यासाठी असतात. ते न वापरता दोषींना शासनच केले नाही किंवा अधिकारामुळे निदरेषींवरच दंडेली केली तर लोकच कायदा हातात घेतात.