१८ जानेवारीच्या ‘लोकरंग’मधील विजय पाडळकरांचा ‘माध्यमांतर : नाटकाकडून चित्रपटाकडे!’ या लेखाचे वाचन म्हणजे पर्वणीच ठरली. नाटक आणि चित्रपट या दोन भिन्न कला असल्या तरीही ज्याप्रमाणे एका lok13कलेचा कमी-अधिक प्रभाव दुसऱ्या कलेवर असतो, तशीच या दोहोंसंदर्भातही ही नाळ अधिक घट्ट आहे. दृक्श्राव्य कलाप्रकाराच्या माझ्यासारख्या रसिकाला या कलांमधील सरमिसळ ओघवत्या शब्दांत अनुभवायला मिळाली. लेखात जर नाटकांनी प्रभावित चित्रपट अथवा चित्रपटांमध्ये नाटकाने आणलेल्या जमेच्या बाजू यांचा ताळेबंद नव्या-जुन्या दाखल्यांसोबत दिला गेला असता तर लेख अधिकच रसीला व संग्राह्य बनला असता. तरीही वाचकांना दिलेल्या या रसपूर्ण भेटीसाठी शतश: धन्यवाद!

गुलजारजींचा सच्चेपणा
माझ्या आवडत्या गुलजारजींनी १८ जानेवारीचा ‘लोकरंग’ जणू भारून टाकलाय. विलक्षण प्रतिभा असलेला हा माणूस साध्या-सरळ सच्चेपणाने अक्षरश: भारावून टाकतो आणि अमृता सुभाष यांच्या लेखातून हे भारावलेपण कसं असू शकतं याचा प्रत्ययही येतो. कवी सौमित्र यांचं ‘शेअिरग’सुद्धा अप्रतिम! या वयातदेखील गुलजारजींना छळणाऱ्या त्यांच्या काव्यप्रतिभेचे रूपक म्हणून आलेल्या म्हातारा-म्हातारीवरच्या ‘त्या’ कवितेने दिवसभर बेचन केले. कसाही, कोणताही संदर्भ मनाशी घेऊन ही छोटीशी कविता वाचली तरी जीव हैराण होतो. ही कविता वाचता वाचता त्याचे माझ्या मनात झालेले भाषांतर गुलजारजींना सलाम म्हणून नम्रपणे सादर करत आहे..
ही म्हातारी नं, मला फार छळते
रात्रभर खोकत असते, औषध घेत बसते
मग माझा हात धरून झोपून जाते
झोपेतच पांघरूण स्वत:च लाथेने उडवते
वर मलाच सांगते की, थंडी वाजते..!
माझ्याच हातांनी तुला चितेवर ढकलून आलो होतो नं  
मग, अजूनही तुला थंडी वाजते?
अगं, तू जात का नाहीस?
.. गुलजारजी तुम्ही महान आहात!
 – प्रदीप अधिकारी, माहीम.
 
गुलबक्षी व मधुमालती वेगळी फुले
अमृता सुभाष यांचा कवी गुलजार यांच्या सहवासातील आठवणी जागवणारा ‘प्रवासी पक्षी’ लेख वाचला. नेहमीप्रमाणेच त्यांनी तो मनापासून लिहिल्याचे जाणवले. त्यात कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळ : ‘गुलबक्षीच्या फुलांनी गजबजले कुंपण’मधील गुलबक्षी म्हणून गुलजार यांनी एक फूल बागेतून आणले व ओरडले : ‘मधुमालती’! अमृता सुभाष यांनीही त्यास मान्यता दिली.
पण माझ्या अल्प मतीप्रमाणे गुलबक्षी नि मधुमालती ही दोन वेगळी फुले आहेत. दोन्ही फुलांत मध असतो व त्यांचे दांडे लांब असतात. पण मधुमालतीचे फूल ताजे असताना पांढरे असते नि झाडावरच शिळे झाल्यावर लालसर होते. याउलट, गुलबक्षीमध्ये पिवळे, तांबडे, पांढरे, गुलबक्षी रंगाची फुले असलेली छोटी झुडपे आढळतात. मधुमालतीचा वेल असतो व तो मंडपावर चढवला जातो. दोन्ही फुले संध्याकाळी फुलतात. तेव्हा िहदी/ उर्दू भाषेतील ‘मधुमालती’ला मराठीत ‘गुलबक्ष’ म्हणत असल्यास माहीत नाही. पण नामसाधम्र्यामुळे गल्लत होऊ नये म्हणून हे पत्र!
– श्रीधर गांगल, ठाणे</strong>

तुम्हें जानते.. जानते..
तुम्हें जानते जानते बहुतसे पन्ने मंने पढम् लिये ।
कई जुट गये, कई बिखर गये ।
दुख इसीका है की मुझे टागोर नहीं मिले ।
मुझे बदलनेवाले कोई लोग नहीं मिले ।
मिलने के लिये कोई नजीक भी नहीं आये ।
खैर
आपको मिलके आपके साथ कुछ पल तो ढले।   
उतनेही पलों में कुछ हरित से मेरे हुवे ।
इसीकी मुझे तसल्ली है ।
– सुरेश पुरोहित

नवीन सदरे उत्तम!
दासू वैद्य यांनी ‘यमक व गमक’मधून घडवलेली पंढरपूरवारी मनापासून आवडली. वारीच्या वाटेवरचं दोन मुक्कामाचं गाव ‘लोणंद’ हे माझं माहेर. माळकरी व वारकरी असलेल्या माझ्या आई-वडिलांच्या घरी वारी म्हणजे जणू दिवाळसणच. माझ्याही माहेरी विठ्ठल-रखुमाईचं मंदिर आहे. तिथेही दर शुक्रवारी कीर्तन, कार्तिकातील काकडआरती, श्रावणातला भागवत सप्ताह होत असतो. प्रत्येक घरी ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल’, ‘ग्यानबा- तुकाराम’चा गजर होत असतो.. स्वत:च्या, मुलांच्याही नावापेक्षा जास्त वेळा केलेला! ‘लय भारी’ चित्रपट तसेच ‘एलिझाबेथ एकादशी’चे दिग्दर्शक परेश मोकाशींचे मन:पूर्वक आभार. असे मराठमोळय़ा मातीचे चित्रपट अधिक प्रमाणावर यावेत, हीच मनोमनी सदिच्छा. रविवार मस्त स्वप्नरंजनात गेला. आजघडीला वास्तवात वारीने दिलेली शिस्त, सहकार व परोपकार आचरणात आलेला आहे. त्याबद्दल म्होरक्या विठ्ठलाचे आभार. आता पंढरपूरला न जाताही ‘नगेली’सारखाच माझ्याही घरी विठोबा कायमचा घरात राहायला आलाय. तसाही पंढरपूरच्या विठोबाचा आत्मा वाढत्या व्यावसायिकतेमुळे हरवल्यासारखाच वाटतो. असो. दासूंना पुढच्या लेखनाकरता शुभेच्छा!
सतीश आळेकरांची ‘गगनिका’ही मस्तच. मी बी.जे. मेडिकलला असताना त्यांचे ‘महानिर्वाण’ नाटक फॉर्मात होते. ‘घाशीराम’मधील मोहन आगाशेंचा अनुल्लेख व खिचडी काकडीस चमचमीत खाणे म्हणणे मात्र खटकले.
– डॉ. शैला कलंत्री, नांदेड.