पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये भाजपचे पाच आणि शिवसेनेचा एक खासदार आहे. आज (मंगळवार) झालेल्या खातेवाटपामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १ राज्यमंत्रीपद आले आहे.
मंत्रिमंडळातील दीर्घकाळ खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे मराठा समाजाचे असून मराठवाडय़ातील नेते आहेत. तर पियूष गोयल हे राज्यसभेतील खासदार असून मुंबईचे आहेत. गोयल हे भाजपचे राष्ट्रीय खजिनदार व भाजपचे जुने निष्ठावंत आहेत.

महाराष्ट्रातील वाट्याला आलेली मंत्रिपदे पुढीलप्रमाणे;
* नितीन गडकरी – रस्ते वाहतूक, जहाज बांधणी
* गोपीनाथ मुंडे – ग्रामविकास, पंचायत राज आणि सांडपाणी व्यवस्था
* अनंत गीते – अवजड उद्योग मंत्री
* प्रकाश जावडेकर – माहिती आणि प्रसारण मंत्रालय (राज्यमंत्री – स्वतंत्र कार्यभार)
* पियुष गोयल – उर्जा , कोळसा (राज्यमंत्री – स्वतंत्र कार्यभार)
* रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण राज्यमंत्री  

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात
chhatrapati sambhajinagar, central minister bhagwat karad
दीड वर्षे मेहनत करुन राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पदरी निराशा

 

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचा राजकीय परिचय 

गोपीनाथ मुंडे – राज्य भाजपचामहाराष्ट्राच्या वाट्याला तीन कॅबिनेट मंत्रालय  महत्त्वाचा चेहरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेला इतर मागासवर्गीयांमधील महत्त्वाचा नेता. ग्रामीण विकास या राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाल्याने स्वत:ची प्रतिमा तयार करण्याची संधी मुंडे यांना मिळाली आहे. मात्र त्यांचे सारे लक्ष महाराष्ट्रात लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता येण्याबाबत भाजप आशावादी आहे. अशा परिस्थितीत मुंडे यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. केंद्रात महत्त्वाचे खाते सोपविण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त नाक खुपसू नका, असा मोदी यांनी अप्रत्यक्ष संदेश दिल्याचे भाजपमध्येच बोलले जाते. मुंडे यांचे मित्र विलासराव देशमुख यांच्याकडे हे खाते काही काळ होते. ग्रामीण भागात विविध योजनांच्या माध्यमातून भाजपचा पाया भक्कम करण्याची पक्षनेतृत्वाची मुंडे यांच्याकडून अपेक्षा असल्याचे मानले जात आहे.
’नितीन गडकरी – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाण पूल, रस्त्यांचे जाळे अशी कामे युतीच्या सरकारमध्ये प्रभावीपणे केल्याने विकास पुरुष म्हणून ओळखले जाणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आवडीचे भूपृष्ठ विकास खाते सोपविण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्षपद गेल्याने गडकरी काहीसे मागे पडले होते. पण अलीकडे पक्षात त्यांचे महत्त्व वाढले. सरकार स्थापनेसाठी मोदी यांच्याकडे झालेल्या बैठकांना राजनाथ सिंग, जेटली यांच्यासह गडकरी उपस्थित असत. अलीकडेच पुर्ती प्रकरणी प्राप्तिकर विभागाने ‘क्लिनचिट’ दिल्याने गडकरी यांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली. महाराष्ट्रात टोल संस्कृतीचा श्रीगणेशा करणारे व टोल संस्कृतीचे समर्थन करणारे गडकरी देशभर ‘टोल’करी होऊ नयेत एवढीच त्यांच्याकडून सामान्य मतदारांची अपेक्षा.
’अनंत गिते – राजकारणात नशीबावर सारे काही अवलंबून असते. नशीबाची साथ मिळाल्यास नेत्याचे भवितव्य फळफळते. त्यात गिते यांचा समावेश होतो. फार गाजावाजा नाही, पक्ष नेतृत्वाच्या शब्दाबाहेर नाही हे सारेच गुण गिते यांना फायदेशीर ठरतात. शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत नाही. म्हणावे तर मतदारसंघातही तेवढा प्रभाव नाही. युतीचे बाकीचे नेते लाखांनी निवडून आले असताना गिते अवघे तीन हजारांनी निवडून आले. अन्य नेत्यांप्रमाणे फार काही महत्त्वाकांक्षा नसल्याने ‘मातोश्री’च्या विश्वासातील. भाजपच्या सरकारमध्ये ऊर्जा, अवजड उद्योग यासारखी खाती भूषविली. त्यानंतर गेली दहा वर्षे शिवसेनेचे संसदेतील नेते. अन्य नेते मंत्रिपदासाठी उत्सुक असताना शिवसेनेने मात्र गिते यांच्याच नावाला पसंती दिली.
’प्रकाश जावडेकर – महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी फेरसंधी नाही, पुण्यातून उमेदवारी नाही अशा परिस्थितीतही संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांना लॉटरी लागली. पक्षाचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी योग्यपणे पार पाडल्यानेच त्यांच्या नावाचा विचार झालेला दिसतो. फारसा जनाधार नसला तरी पश्चिम महाराष्ट्रातून जावडेकर यांना संधी दिली.
’पियुष गोयल – मोदी यांच्या प्रचाराचे व्यवस्थापन करणाऱ्या नेत्यांमध्ये गोयल यांचा समावेश होतो. वडील वेदप्रकाश हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते. त्यांनी केंद्रात मंत्रिपद भूषविले होते. राज्यमंत्री स्वतंत्र कारभार म्हणून ऊर्जासारखे महत्त्वाचे खाते सोपवून मोदी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. पक्षाचे खजीनदार म्हणून तिजोरी भरभक्कम राहिल हे बघण्याचे त्यांचे काम. मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेल्या एकालाही संधी देण्यात आलेली नसली तरी गोयल यांच्या रुपाने पक्षाने मंत्रिमंडळात मुंबईला प्रतिनिधीत्व दिले आहे. राज्यातून पक्षाने त्यांना मागेच राज्यसभेवर संधी दिली होती.
’रावसाहेब दानवे जालना मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपवून पक्षाने मराठवाडय़ात भाजप अधिक भक्कम होईल यावर भर दिला आहे. मुंडे यांच्या जवळचे म्हणून मानले जाणाऱ्या दानवे यांची कसोटी आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा नेता म्हणून भाजपने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली आहे.