आम आदमी पक्षाचा ‘लोकसभा निवडणूक २०१४’ साठीचा जाहीरनामा पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.
केजरीवाल यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात अनेक महत्वाची आश्वासने जनतेला दिली आहेत. तसेच केंद्रात सरकार येताच जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यावर पक्षाचा भर राहिल असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या जाहीरनाम्यात जनलोकपालाचा मुद्दा सर्वोच्च स्थानी आहे. नोकरदारापासून पंतप्रधानांपर्यंतचा प्रत्येक व्यक्तीचा लोकपाल विधेयकाअंतर्गत समावेश करण्यात येईल असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. जनतेच्या सल्ल्यानुसार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असून एकूण 28 पानांचा हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

आम आदमी पक्षाचा ‘लोकसभा निवडणूक २०१४’ साठीचा जाहीरनामा वाचण्यासाठी खालील छायाचित्रावर क्लिक करा: