देशात गरीब आणि कॉर्पोरेट भारतीय अशी स्थिती निर्माण करण्याचे भाजपच्या धोरणातून दिसून येते अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचे धोरण आजवर भाजपने अवलंबले असल्याचेही ते म्हणाले.
राहुल म्हणाले, “देशात हिंदू-मुस्लिम यांच्या वितुष्ट असावेत अशीच मुळात भाजपची इच्छा आहे आणि प्रयत्नही. भाजपकडून केवळ कॉर्पोरेट लोकांनाच महत्व दिले जात आहे. व्यापारी, उद्योगपती यांचीच प्रगती त्यांना महत्वाची वाटते. देशातील गरिब जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांना देशात भारतीयांचे दोन गट निर्माण करायचे आहेत. एक म्हणजे, देशातील गरीब भारतीय आणि दुसरे कॉर्पोरेट भारतीय. काँग्रेसची मात्र, देशातील नागरिकांची अशी वर्गवारी करण्याची विचारसरणी नाही. देशातील सर्व जाती, धर्म आणि प्रत्येक भारतीयाची प्रगती करणे काँग्रेसचे उद्दीष्ट आहे.” असेही राहुल पुढे म्हणाले.