पंतप्रधान डॉ़  मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान नसून ‘सशक्त’ आहेत, हे दर्शविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी गेल्या दशकातील आर्थिक प्रगतीची माहिती प्रसिद्ध केली़  या माहितीनुसार, एखाद्या दुबळ्या पंतप्रधानाकडून इतका आर्थिक विकास होणे अशक्य आहे, असे पंतप्रधानांचे जनसंपर्क सल्लागार पंकज पंचौरी यांनी शुक्रवारी येथे म्हटल़े
पंतप्रधानांनी आणि यूपीए शासनाने या काळात केलेल्या प्रगतीची माहिती माध्यमांच्या वेगळ्या प्राथमिकतेमुळे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोप त्यांनी या वेळी केला़  गेल्या १० वर्षांत जीडीपी आणि देशाचे दरडोई उत्पन्न तिप्पट वाढले आह़े  किमान मजुरीसुद्धा तिप्पट वाढली आह़े यावरून देशाची प्रगती दिसून येते, असेही ते म्हणाल़े
पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात करण्यात आलेले आरोप खोडण्यासाठी ही माहिती प्रसिद्ध केल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान सिंग यांचा स्वत:च्या कामातूनच बोलण्यावर विश्वास आहे, असा टोलाही या वेळी पंचौरी यांनी लगावला़
डॉ़ सिंग मौन धारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी खोडून काढला़  सिंग यांनी आतापर्यंत तब्बल १ हजार १९८ भाषणे दिली़  तसेच अनेक प्रसिद्ध पत्रकेही दिली आहेत़  यातील बहुतेक अर्थव्यवस्था, विकास, कृषी, विज्ञान, शिक्षण आदी विषयांवर होती, असेही त्यांनी सांगितल़े  सरासरी दर तीन दिवसांनी पंतप्रधान माध्यमांशी विविध माध्यमातून संवाद साधतात़  परंतु, त्याची दखल घेतली जात नाही, असेही पंचौरी म्हणाल़े  माध्यमे राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन यावर अधिक भर देतात़  आणि त्यावर पंतप्रधान फारसे बोलत नाहीत़  ते संसदेतच राजकारणाबद्दल बोलतात़  त्यांच्या सत्तेच्या दहा वर्षांत १४० दशलक्ष लोक गरीबीतून बाहेर आले आहेत, असेही त्यांनी सांगितल़े

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…