भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अध्र्या चड्डी’वर घसरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कृतीतून प्रत्युत्तर देत डोंबिवलीतील संघ स्वयंसेवकांनी अध्र्या चड्डीच्या गणवेशात मतदान केले. ‘संघ वचवच करीत नाही प्रत्यक्ष कृती करतो’ हेही या माध्यमातून आम्ही पवार यांना दाखवून दिले असे मतदान करणाऱ्या स्वयंसेवकांनी सांगितले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचाराच्या सभेत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडून विधान केले.
अर्धी चड्डीवाल्यांच्या हातात देशाची सत्ता देणार का असा प्रश्न केला होता. जिव्हारी लागलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी गुरुवारी मतदानाच्या दिवशी संघाच्या प्रभात शाखेवर गेलेले संघ स्वयंसेवक शाखा संपल्यानंतर घरी न जाता तसेच थेट अध्र्या चड्डीवर मतदान केंद्रात गेले आणि त्यांनी गणवेशात मतदान करत शरद पवार यांना स्वयंसेवकांनी  प्रत्युत्तर दिले.