कल्याण लोकसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. यंदा मात्र कधी नव्हे इतकी चुरस युतीच्या या बालेकिल्ल्यात निर्माण झाली आहे. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतल्याने शिवसेनेने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ.श्रीकांत शिंदे यांना येथून िरगणात उतरविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथून प्रमोद ऊर्फ राजू पाटील या तुल्यबळ उमेदवारास िरगणात उतरविल्याने या मतदारसंघात जातीपातींच्या समीकरणांना महत्त्व आले असून इतर कुणाहीपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
 परांजपे यांच्या विरोधात सुरुवातीला शिवसेनेला येथून उमेदवार मिळत नव्हता. परांजपे यांच्या विरोधातील सामना सोपा राहील, असे शिवसेना नेत्यांना वाटले होते. याच भागातील मनसेचे आमदार रमेश पाटील आणि शिंदे यांचे सख्य राहिले आहे. त्यामुळे पाटील यांचे बंधू येथून निवडणूक लढविणार नाहीत, हा शिवसेना नेत्यांचा अंदाज चुकीचा ठरला आणि एकनाथ िशदे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरली.
जातीय समीकरणांना महत्त्व
या मतदारसंघात ब्राह्मण, आगरी, मुस्लीम समाजातील मतदारांची एकगठ्ठा मते आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची ताकद आहे. शरद पवारांनी जाहीर भाषणात संघाचा उल्लेख ‘अर्धे चड्डीवाले’ असा केला. या मतदारसंघात विशेषत मुंब्रा आणि अंबरनाथ येथील अल्पसंख्याकांच्या ध्रुवीकरणासाठी पवारांनी संघाला अंगावर घेतल्याची चर्चा असली तरी त्यामुळे परांजपे यांचे डोंबिवली, कल्याणातील जातीचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या मतदारसंघात आगरी समाजातील सुमारे अडीच लाख मतदार आहेत. मनसेचे उमेदवार आगरी समाजाचे असल्याने ‘जात’ विषय प्रभावी करून अन्य पक्षातील आगरी समाजातील नेत्यांना आपलेसे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मनसेचा उमेदवार सतत बँकॉक येथे का जातो, असा सवाल करत शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाटील यांना अडचणीत आणण्याम्चा प्रयत्न चालविला आहे. शरद पवार यांनी तर पाटील यांच्या बँकॉक, सिंगापूर दौऱ्याची चौकशी केली जाईल, असा गुगली टाकली. भारतातील काही बडय़ा गँगस्टर मंडळींचा तेथे असलेला वावर लक्षात घेता पवारांनी टाकलेला हा गुगली टोलविणे पाटील यांना जड जाऊ लागले आहे. कल्याण लोकसभेत १९ लाख मतदार आहेत. २००९ मध्ये या मतदारसंघात जेमतेम ३४.३१ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड महिन्यापासून महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेला मतदार महायुतीकडे आकृष्ट झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील रखडलेले प्रश्न  मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत.     
डॉ. श्रीकांत शिंदे (महायुती)

election 2024 fight, bhandara gondia lok sabha constituency, congress, BJP
मतदारसंघ : भंडारा – गोंदिया; भाजप आणि काँग्रेसमधील लढतीत कोण बाजी मारणार ?
lok sabha elections 2024 dcm devendra fadnavis announced name of shrikant shinde from kalyan
श्रीकांत शिंदेंचे ‘कल्याण’; फडणवीसांची ठाण्यात ‘पाचर’, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा
police checked groom vehicle
शुभमंगल नंतर आधी सावधान! पोलिसांनी नवरदेवाच्या गाडीची घेतली झाडाझाडती; काय आहे नेमका प्रकार?
pune bjp marathi news, pune bjp lok sabha seats marathi news, pune bjp loksabha election marathi news
पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी

कल्याण परिसरातून रेल्वे ४०० कोटी महसूल गोळा करते. त्या बदल्यात कोणत्याही सुधारणा प्रवाशांना दिल्या जात नाहीत. मुंब्रा समांतर रस्ता, कब्रस्तानचा प्रश्न, कल्याण टर्मिनल, टोलनाके बंद करणे, नेवाळी विमानतळ यासाठी माझा प्रयत्न राहील.
प्रमोद (राजू) पाटील (मनसे)

खासदार म्हणून गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात रेल्वे सुविधा, स्कायवॉकची कामे केली. स्थानकात उड्डाणपूल मंजूर करून घेणे, सरकते जिने, याशिवाय शहरांच्या अनेक भागात खासदार विकासनिधी वापरून विकासकामे केली. ही विकासकामे पाहून मतदार मते देतील.  
आनंद परांजपे (आघाडी)