* आसाममधील कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाबार्डकडून ७३१.२३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
* या निधीतील ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.
* ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाबार्डकडून ६०२.३६ कोटी रुपये तर राज्य सरकारकडून ३९४.६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
* ग्रामीण विकास निधी अंतर्गत आसामसाठी मंजूर करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे, असे नाबार्डचे व्यवस्थापकीय प्रमुख एस. नटराजन यांनी सांगितले.
* नाबार्डकडून स्थानिक कृषी विकासासाठी सहकारी आणि ग्रामीण बँकांना ६५.९४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
* या बँका १७ जिल्ह्य़ांतील कृषीविकास आणि वराहपालनावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

नारळ आणि खोबऱ्याचे भाव स्थिर
* तमिळनाडू कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना नारळ विक्रीचा सल्ला दिल्यामुळे बाजारात नारळ आणि खोबऱ्याचे भाव स्थिर राहिले आहेत.
* केरळ आणि तमिळनाडूत नारळाचे उत्पादन बऱ्यापैकी झालेले आहे. मात्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये उत्पादन तुलनेने घटले आहे.
* गतवर्षांच्या तुलनेत यंदा इतर राज्यांतून खोबऱ्याची आवकही कमी झाली आहे. खोबऱ्याची जूनपर्यंत ५२ ते ५४ रुपये किलो किंमत राहील असा विद्यापीठाचा अंदाज आहे.