ग्रामीण भागात शेतीला पाणीपुरवठा करण्यामध्ये आजही सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा हिस्सा अधिक आहे. पारंपरिक पाट पद्धतीने पाणीपुरवठा करण्यावर या संस्थांचा भर आहे. यात आमूलाग्र बदल घडवला आहे तो करवीर तालुक्यातील िदडनेर्ली गावच्या श्री भरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेने. किंबहुना सहकारातील पहिलीच अत्याधुनिक ठिबक सिंचन योजना राबवणारी संस्था म्हणून ती पुढे आली आहे. इस्रायलच्या धर्तीवर सर्वार्थाने अत्याधुनिक अशा या योजनेस अंदाजे चार ते सव्वाचार कोटी रुपये खर्च झाले असून ७०० एकर शेती कमीत कमी पाण्याद्वारे शास्त्रीयदृष्टय़ा भिजणार आहे.

शेती करण्याच्या पद्धतीमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. सिंचनासाठी ठिबकचा वापर हे त्यातीलच एक पाऊल. ठिबकचा वापर होऊनही आता बराच काळ लोटला. पण त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आजही सीमित आहे. विशेषत ग्रामीण भागात शेतीला पाणीपुरवठा करण्यामध्ये आजही सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा हिस्सा अधिक प्रमाणात आहे. पारंपरिक पाट पद्धतीने पाणीपुरवठा करण्यावर या संस्थांचा भर आहे. यात आमूलाग्र बदल घडवला आहे तो करवीर तालुक्यातील िदडनेर्ली गावच्या श्री भरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेने. किंबहुना सहकारातील पहिलीच अत्याधुनिक ठिबक सिंचन योजना राबवणारी संस्था म्हणून ती पुढे आली आहे. इस्रायल राष्ट्राच्या धर्तीवर सर्वार्थाने अत्याधुनिक अशा या योजनेस अंदाजे चार ते सव्वाचार कोटी रुपये खर्च झाले असून ७०० एकर शेती कमीत कमी पाण्याद्वारे शास्त्रीयदृष्टय़ा भिजणार आहे. दुबार पीक , शेती उत्पादनात वाढ, कमी श्रम, अधिक लाभ असे याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनानेही महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ सन २०१५-१६ पासून समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेची उद्दिष्टे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे, समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे, कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आदी या योजनेची उद्दिष्टे आहेत. हाच हेतू पुढे नेण्याचे काम सदर संस्था करत आहे.

राष्ट्रीय जल धोरणाला पोषक व पुरक ठरणारी, शेतक-यांच्या जीवनात नवी आíथक आणि जलक्रांती ठरविणारी, शेती उत्पादनात भरघोस वाढ करणारी, अंदाजे ७०० एकर जमीन शास्रशुद्धपणे पाण्याखाली भिजून सुजलाम आणि सुफलाम होणारी ठिबक सिंचन जलपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेने साकारला आहे.  इस्रायलच्या धर्तीवर सर्वार्थाने अत्याधुनिक अशा या योजनेस अंदाजे ४ कोटी १४ लाख इतका खर्च आहे. करवीर तालुक्यातील दक्षिणेला वसलेले िदडनेर्ली हे डोंगरी गाव. गावापासून ५ कि.मी. अंतरावर वाहणारी दुधगंगा नदी, कमी पर्जन्यमान, कायमस्वरुपी दुष्काळी भाग अशी गावाची जुनी ओळख. गावातील विहिरी, ओढे, नाले आणि पावसाळ्यात पडणारा जेमतेम पाऊस इतकीच तुटपुंजी पाण्याची उपलब्धता. त्यामुळे पावसाळ्यातील वरुणराजाच्या कृपेवर जिरायत शेती हीच गावकऱ्यांची उदरनिर्वाहाची साधने. हळूहळू कोल्हापुरात धरण प्रकल्प साकारले. राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाचे काम केल्याने जिल्हा सुजलाम -सुफलाम होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. अशातच काळमावाडी प्रकल्प पूर्ण झाला अन दुधगंगेचे कार्यक्षेत्र बदलून गेले.

पहिले यशस्वी पाऊल

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात उपअभियंता म्हणून सेवा करत असताना आपल्या मूळ िदडनेर्ली जन्मभूमीचा शेतीविकास करण्याचे स्वप्न व्ही. डी. कुलकर्णी यांनी पाहिले होते. त्यांनी गावातील काही शेतकरी बांधवाना एकत्र करून त्यांना पाणीपुरवठा योजनेची माहिती सांगितली. जलक्षेत्रातले आपले ज्ञान, योजनेविषयीची तळमळ, प्रामाणिकता, कष्टाची तयारी आदी गोष्टी गावकऱ्यांना भावल्या आणि २००४ साली गावचे आराध्य दैवत यांचे नावे श्री भरवनाथ पाणीवनलस, पुरवठा संस्था स्थापन केली. १५० सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने एकूण ७०० एकर क्षेत्रापकी ४०० एकर क्षेत्र भिजवणारी अंदाजे दोन कोटी १४ लाख खर्चाची पाटाच्या पाण्याची योजना कॅनरा बँकेच्या अर्थसहाय्याने २००८ साली पूर्ण करून ती कार्यान्वित केली. या योजनेद्वारे सभासद शेतकऱ्यांची २०० एकरातील ऊस पिकाला व २०० एकरातील खरीप पिकांना कायमचा पाणीपुरवठा होऊ लागला. शेतकऱ्यांनी ऊस, आंतर पिके घेऊन मिळविलेल्या उत्पन्नातून पाच वर्षांत सुमारे ४ कोटी १८ लाख इतकी रक्कम मुद्दल व व्याजापोटी कॅनरा बँकेकडे परतफेड केली.

या योजनेद्वारे सभासद शेतकऱ्यांची आíथक उन्नती झाली. शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शेतकरी वर्गात जनजागृती झाली. नवनवीन शेती प्रयोगाकडे लक्ष वेधू लागले. कार्यक्षेत्र विस्ताराचा विचार सुरू झाला. तेव्हा कमीत कमी पाणी वापर, खर्चात कपात करून दुप्पट शेती उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन पद्धतीची योजना साकारण्याचा सभासद शेतकऱ्यांनी विडा उचलला. दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजी कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमंत समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते या ठिबक सिंचन जल योजनेच्या कामास प्रारंभ करण्यात आला. आज या योजनेचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाची बांधणी..

यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील उभी पिके पाण्याअभावी उन्हाने करपून गेली आहेत. पण िदडनेर्लीचा हा माळ ठिबक सिंचन योजनेमुळे हिरवागार राहिला आहे. या योजनेव्दारे एकूण ७०० एकर शेती कमीत कमी पाण्याव्दारे शास्रीयदृष्टय़ा भिजणार आहे. त्यासाठी दुधगंगा नदीतील पाणी ५ कि.मी. वरून जलवाहिन्याद्वारे आणून गावात उभ्या केलेल्या सुमारे साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या आर.सी.सी. टाकीत त्याचा साठा करून त्या अत्याधुनिक पद्धतीच्या विना गळतीच्या पी.व्ही.सी. पाईपव्दारे शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत स्वयंचलित, संगणकीय, वायरलेस यंत्रणेव्दारे पिकांना पुरविण्याचा भगिरथ प्रयत्न संस्थेने साकारला आहे. या योजनेत पाण्याचा कमीतकमी तसेच योग्य वापर, गळती, पाण्याची नासाडी बंद, कमीत कमी मनुष्यबळाचा वापर, दुप्पट उत्पादन, विजेची बचत, खर्चात काटकसर आणि आíथक उत्पन्नात वाढ, सभासद शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोल्हापुरातील हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी पहिल्या योजनेच्या निम्या कालावधीत कर्जाची परतफेड करणाऱ्या या संस्थेला ४ कोटी १४ लाखाचे कर्ज कॅनरा बँकेने उपलब्ध करून दिले आहे. एरवी काळजाच्या तुकडय़ाप्रमाणे जपणाऱ्या शेतीला शेतकऱ्यांनी बँकेकडे तारण ठेवले आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्याचा या कर्जापोटी एकरी १ लाख साडेतीन हजार रुपये इतका खर्च येणार आहे. पहिल्या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना कार्यान्वित करून जमिनीचा पोत सुधारत अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचा संकल्प सभासद शेतकऱ्यांनी सोडला आहे. योजनेच्या कार्यसफलतेसाठी प्रत्येक सभासद शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असून ही योजना केवळ कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीला नवी कलाटणी देणारी ठरणार आहे. याबद्दल आम्हाला प्रचंड विश्वास आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल धोंडोपंत कुलकर्णी यांनी दिली. त्यांना याकामी एन.डी. कुलकर्णी, आकाराम बोटे, बाजीराव जाधव, दत्तात्रय श्रीपती जाधव, दत्ता सपकाळ, अन्य संचालक मंडळ व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

dayanandlipare@gmail.com