* भारत हा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश
* मागील वर्षी २० लाख हेक्टर क्षेत्रफळावर तब्बल ४२ दशलक्ष बटाटय़ाचे उत्पादन
* प्रतिहेक्टरी २१ टनांपर्यंत उत्पादकतेत वाढ
* लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनातही वाढ
* २०१२-१३मध्ये बटाटा उत्पादनात ७.४ टक्क्य़ांनी वाढ. नंतरच्या दोन वर्षांत मात्र वाढीला खीळ
* बटाटा उत्पादनात देशात महाराष्ट्र अग्रेसर. मागील पंधरा वर्षांत उत्पादनात १७.३ टक्क्य़ांनी वाढ. त्याखालोखाल बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात.
* लागवडीखालील क्षेत्रवाढीसोबत नव्या वाणांचा वापर, शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतीपूरक धोरणे आणि सुधारित विपणनप्रणालीमुळे बटाटा उत्पादकतेत वाढ
* प्रतिहेक्टरी उत्पादकतेत मात्र गुजरात प्रथम स्थानी. प्रतिहेक्टरी २६५१४ किलोग्रॅम उत्पादन. त्या खालोखाल पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशचा क्रमांक.

केळी
* आंब्यापाठोपाठ उत्पादनात केळ्याचा क्रमांक. ३०.२५ दशलक्ष टन उत्पादनासह भारत केळी उत्पादनात जगात आघाडीवर
* प्रतिहेक्टरी उत्पादन ३७. २९ टन
* गुजरात, आंध्रप्रदेश व बिहारची उत्पादनवाढीत आघाडी.
* महाराष्ट्र, केरळ आणि आसामची उत्पादकतेत
घट. परंतु, सर्वाधिक सरासरी उत्पादनात महाराष्ट्र प्रथमस्थानी.