ऊसशेती एके ऊसशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भूपाल गोिवद खामकर यांच्या केळी उत्पादनाचा आदर्श ठरावा. आजही वयाच्या ८०व्या वर्षी शेतात पाय रोवून उभे राहणारे जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील भूपाल खामकर यांचा शेती करण्याचा बाणा केवळ प्रेरणादायी नव्हे तर शेती फायदेशीर कशी करावी हे दर्शवणारा आहे. तब्बल आठ दशकांची आणि तीन पिढय़ांची केळी शेतीची गाथा प्रयोगशील शेतकऱ्यांनी डोळ्याखालून घालावी अशीच आहे.

कोल्हापूर जिल्हा म्हणजे उसाचे आगार. पाहावे तिकडे ऊसच उस. टनेज आणि उतारा दोन्हीतही वरचढ. त्यामुळे ऊसशेती करण्याला प्राधान्य न मिळेल तरच नवल. पण, ऊसशेती एके ऊसशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भूपाल गोिवद खामकर यांच्या केळी उत्पादनाचा आदर्श ठरावा. आजही वयाच्या ८०व्या वर्षी शेतात पाय रोवून उभे राहणारे जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील भूपाल खामकर यांचा शेती करण्याचा बाणा केवळ प्रेरणादायी नव्हे तर शेती फायदेशीर कशी करावी हे दर्शवणारा आहे. तब्बल आठ दशकांची आणि तीन पिढय़ांची केळी शेतीची गाथा प्रयोगशील शेतकऱ्यांनी डोळ्याखालून घालावी अशीच आहे. यंदा त्यांनी ५० गुंठय़ात साडेपाच लाखाचे उत्पन्न मिळवले, खर्चवजा जाता पावणे चार ते चार लाख निव्वळ नफा झाला आहे. अजूनही ५-६ टन केळी विकली जाणार आहेत .

electricity cut, thane city, CM eknath shinde
मुख्यमंत्री शिंदेंच्या शहरात ४० टक्के भागात बत्तीगुल
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

जयसिंगपूर शहराच्या पश्चिमेला खामकर यांची १४ एकर शेती आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला काळ्या मातीची शेती असताना खामकर यांचा जमिनीचा हा डाग पांढऱ्या मातीचा आहे. जमिनीत लोहाचे प्रमाण कमी असल्याने ऊस पांढरा पिकतो, असा खामकर कुटुंबीयांचा अनुभव. यामुळे त्यांचे वडील गोिवद खामकर यांनी १९३५ सालच्या सुमारास केळी शेती करण्याचा निर्णय घेऊन तो यशस्वीपणे कृतीत आणला. बागायती शेतीला पाणी कमी पडू नये यासाठी पूर्वेला असलेल्या कृष्णा नदीतून १६ हजार फूट सिमेंटची पाइप लाइन टाकली. आजही याद्वारे शेतात पाणी खेळते. खामकर कुटुंब शेतीत रमलेले. हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. दोन मुले आणि अवघे कुटुंब या शेतीमध्ये गेली अनेक वष्रे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत असते. ऊस, केळी, भाजीपाला अशी प्रमुख पिके आजवर घेतली गेली. संपूर्ण जमीन बागायतीची आहे. नदी, विहीर आणि बोअरचे पाणी शेतीला दिले जाते.

अलीकडे सव्वा एकरात केळीचे उत्पादन घेतले. त्याचे उत्पादन बाजारात विक्रीला पाठवले गेले. ऑगस्टमध्ये दीड एकर आणि तत्पूर्वी जुल मध्ये २ एकर केळीची लागण केली आहे. गेलेल्या केळीचा प्रयोग खूप उत्साहवर्धक आहे. केळीचे पीक घेण्यापूर्वी या क्षेत्रात ऊस पिकवला जाई. ऊस गेल्यानंतर काही दिवस जमिनीला विश्रांती दिली गेली. चांगला बेवड आणि फेरपालट म्हणून या जमिनीची केळी पिकासाठी निवड केली. बरेच दिवस या रानात मेंढरे बसविली होती. रान चांगल्यापकी खतविले गेले आहे. यानंतर १०-१२ ट्रॉली शेणखत घातले आहे. जून-जुलमध्ये तागाचा बेवड पीक केले. त्यानंतर रानाची नांगरणी करून ६ बाय ५ फुटावर अंतरावर रोपांची लागण केली आहे. तळसंदे येथील विश्वास चव्हाण सीमा बायोटेक मध्ये टिशूकल्चर प्रकारची रोपे २००२ साली बनवली . जावयाने विकसित केलेले तंत्र तेव्हापासून खामकर कुटुंबाने अवगत केले.

रोपे लावताना बेसल डोस दिलेला आहे. रोपांची लागण होताच ठिबक सिंचनाची व्यवस्था केली गेली आहे. प्रत्येक रोपाच्या बुंध्यात किमान अर्धा किलो गांडूळ खत पडेल, अशी मात्रा दिली गेली आहे. त्यानंतर द्रवरूप खतेच वापरलेली आहेत. बाळभरणी आणि मोठय़ा भरणीच्यावेळी काही रासायनिक खते, िनबोळी पेंड, स्टेरामिल, म्युराटे पोटॅश अशी सेंद्रीय खतांची मात्रा वापरली आहे. ठिबक सिंचनाव्दारे पाणी व्यवस्थापन असले तरी पाटपाणीही दिले जाते. त्यामुळे बागेत गारवा कायम राहण्याला मदत होते. केळी पिकवण्याचे टप्पे लक्षात घेतले पाहिजेत. लागणीपासून सहाव्या महिन्यात केळफूल सुरू होते. आणि १२व्या महिन्यात केळी काढणीस सुरुवात झाली. साधारणपणे सरासरी ३५ किलोचे घड पडलेले होते. काही घड ५० किलोपर्यंत होते. सव्वा एकरात ४५ टन उत्पादन मिळाले आहे.

अजून पाच-सहा टन माल शिल्लक आहे. व्यापारी स्वत जागेवर येऊन खरेदी करतात. माल काढून देण्याचे काम आम्ही करतो. सरासरी १२ हजार रुपयांनी आमच्या केळीला दर मिळालेला आहे, असे खामकर यांनी सांगितले.

लागणीपासून काढणीपर्यंत प्रतिरोप १३० रुपये म्हणजे १ लाख ८२ हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि ४५ टन गुणिले १२ हजार रुपये सरासरी दर पडकला तरी ५ लाख ६० रुपये उत्पन्न आहे. पावणे चार ते ४ लाख रुपये निव्वळ नफा आहे. एक पिकापेक्षा बहुपिक पद्धतीचा फायदा या पिकातून आपल्याला मिळविता येतो. केळी शेतीचा अनुभव कथन करताना भूपाल खामकर सांगतात की, ऊसापेक्षा केळीचे पीक अधिक परवडणारे. अर्थात त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दरामध्ये खूप तेजी-मंदी असते. केळी पिकामुळे ऊसाच्या शेतीला फेरपालट होते.

केळीच्या पीकामुळे जमिनीचा पोत सुधारण्याला मदत होते. केळीची पाने, कोंब जागीच कुजविल्याने जमिनीला सेंद्रीय कर्ब मिळते. ऊसापेक्षा केळी पिकामध्ये गुंतवणूक जास्त आहे. पण

परतावाही तितकाच जास्त आणि फायद्याचा आहे. करपा आणि सिगाटोका आणि मर रोगाची लागण केळीमध्ये होते. खामकर यांचा सल्ला मनावर घेऊन काटेकोर आणि काळजीपूर्वक ही शेती केली तर ‘केळीचे फुलले बाग’चा अनुभव घेता येईल, हे नक्की.

खताच्या नोंदी 

  • केळीची लागण – १५ ऑगस्ट, २०१५
  • लागणीच्या दिवशी १० किलो थिमेट
  • बेसल डोस म्हणून ४०० किलो गांडूळ खत, १९-१९-१९, ०-५२-२२
  • पालाशयुक्त खते आणि मूलद्रव्ये यांचे मिश्रण करून वापरले.
  • दुसरा डोस (५-०९-२०१५)
  • डी. ए. पी. १०० किलो (१८-४६ -०)
  • म्यु. पोटॅश १०० किलो (०-०-६०)
  • िनबोळी पेंड १०० किलो (२०-०-०)
  • युरिया १०० किलो (४६-०-०)

बाळ भरणीच्या वेळी दिलेला डोस

  • डी. ए. पी. ५० किलो (९-२३-०)
  • आमो. सल्फेट ५० किलो (१०-०-०)
  • म्यु. पोटॅश १०० किलो (०-०-६०)
  • सॅटेरामिल ५० किलो (०-०-०)
  • युरिया ५० किलो ( २३-०-७)

dayanandlipare@gmail.com