देशात सुमारे ९५०० लहान-मोठय़ा कंपन्या आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक औषधांची निर्मिती करतात. त्यांच्यात आता स्पर्धा सुरू झाली असून दर्जाबाबत एकमेकांवर लक्ष ठेवून आहेत. साहजिकच औषधी वनस्पतींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून औषधी वनस्पतीची शेती सुरू झाली असून केंद्राने बाजारपेठ निर्मितीकरिता कार्यक्रम आखला आहे. या संधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनऔषधी विभागाने शारंगधर या कंपनीच्या माध्यमातून करार शेतीला चालना देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेक आध्यात्मिक गुरूंनी योगाबरोबरच आयुर्वेदाचा प्रचार सुरू केला. त्यातील काहींनी आयुर्वेदिक उत्पादने बाजारपेठेत आणली. त्यामुळे आता पुन्हा एकदा आयुर्वेदाला चांगले दिवस आले. मात्र आजही या उत्पादनाकरिता लागणाऱ्या जडीबुटी, वनस्पती या जंगलातून, डोंगरदऱ्यांतून, आदिवासींकडून अत्यंत कमी मोबदला देऊन विकत घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे देशात सुमारे ९५०० लहान-मोठय़ा कंपन्या आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक औषधांची निर्मिती करतात. त्यांच्यात आता स्पर्धा सुरू झाली असून दर्जाबाबत एकमेकांवर लक्ष ठेवून आहेत. साहजिकच औषधी वनस्पतींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून औषधी वनस्पतीची शेती सुरू झाली असून केंद्राने बाजारपेठ निर्मितीकरिता कार्यक्रम आखला आहे. या संधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनऔषधी विभागाने शारंगधर या कंपनीच्या माध्यमातून करार शेतीला चालना देण्याचा प्रयत्न चालविला आहे. शेतकऱ्यांचा त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री
irdai retains existing insurance policy surrender value rule
विमा नियामकांकडून पारदर्शकतेचा आग्रह धरणारी १ एप्रिलपासून नवीन नियमावली

आयुर्वेद हे पुरातन शास्त्र असून शरीराचे स्वास्थ्य व रोगमुक्तीसाठी हे शास्त्र उपयोगी ठरले आहे. सुमारे दोन हजार वनस्पतींमध्ये निरनिराळे आजार बरे करण्याची क्षमता औषधी वनस्पतीमध्ये असल्याचे आयुर्वेद शास्त्रात झालेल्या संशोधनात आढळून आलेले आहे. जागतिक पातळीवर वनौषधींना मोठी बाजारपेठ आहे. आता जगातील अनेक देशही त्याकडे आकर्षति झाले आहेत. बदलती जीवनशैली, तणावाखालील जीवन, फास्ट फूड, दूषित वातावरण यामुळे अनेक रोग निर्माण झाले असून त्याच्या उपचारांवर औषधी वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. आधुनिक अ‍ॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीतही २५ ते ३० टक्के औषधी वनस्पती वापरल्या जातात. मात्र आता अनेक वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सर्पगंधा, कळलावी, सीताशोक, दशमुळे यांसारख्या अनेक वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी आयुषचे प्रयत्न चालू आहेत. जागतिक बाजारपेठेत वनौषधींची मागणी चौदा अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. या बाजारपेठेत चीनचा वाटा १९ टक्के आहे, फ्रान्स ६० टक्के, जर्मनी ७ टक्के तर भारताचा वाटा मात्र ९ टक्क्यांवर आहे. भविष्यात त्यात मोठी झेप घेता येऊ शकते. खरे तर अजून वनौषधींची शेती अद्याप सुरू झालेली नाही. मात्र आता कृषी अनुसंधान परिषदेच्या लखनौ येथील केंद्र व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी त्यांची पीकपद्धती विकसित करण्यास प्रारंभ केला आहे. जगात दोन लाख पन्नास हजार वनौषधी आहेत. त्यांपकी केवळ वीस हजारच नोंदणीकृत आहेत. पाच हजार वनस्पतींचे रासायनिक पृथक्करण झालेले आहे. भारतात सहा हजार वनस्पती आढळून येतात. त्यांपकी ९६० वनस्पती बाजारपेठेत उपलब्ध असून १७८ वनस्पतीच व्यापारी तत्त्वावर बाजारपेठेत आहेत. खरे तर जगात आजही ८० टक्के आयुर्वेदाचा वापर केला जातो. विविध धर्म, जात, पंथाचे मिळून जगातील ५०० समाजघटक हे दैनंदिन जीवनात ८०० वनस्पतींचा वापर करतात. देशात आजही सुमारे ७६४ कोटी रुपयांची वनौषधी आयात केली जाते. मात्र चौदाशे कोटी रुपयांची निर्यात केली जाते. देशात पस्तीस हजार कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात होते. आता भविष्यात या उद्योगाच्या वार्षकि वाढीचा वेग हा १५ ते १६ टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे आता केवळ जंगलातच नव्हे तर शेतातही त्याची पदास करून आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करणे शक्य आहे.

राज्याला सहय़ाद्रीच्या घाटमाथ्याचे वरदान लाभले आहे. पश्चिम घाटात प्रचंड प्रमाणात जैविक विविधता आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात सातपुडा पर्वतरांगाजवळ नसíगक वनौषधी मोठय़ा प्रमाणात आढळतात. राज्यातील जमीन, हवामान, पाणी व भौगोलिक परिस्थिती औषधी वनस्पतीच्या वाढीला अत्यंत अनकूल अशी आहे. शतावरी, इसबगोल, अश्वगंधा, ब्राह्मी, गुग्गळ, आवळा, हिरडा, अशोक, बेला, भुईआवळा, चित्रक, एरंड, गोकरू,  गुळवेल, जांभूळ, काळमेघ, मुकना, कोरपड, मंजिष्टा, लोध्र, निरगुडी, िपपळी, गुलाबफु ल, सफेद मुसळी, स्टीव्हीया, सेना, हळद याची शेती करता येऊ शकते. आतापर्यंत वन खात्याकडून किंवा आदिवासींकडून अत्यंत कमी किमतीत या औषधी वनस्पती खरेदी  केल्या जातात. त्या माध्यमातून कंपन्या आíथकदृष्टय़ा बलवान झाल्या. मात्र या औषधी गोळा करून त्याची विक्री करणारे गरीब राहिले. त्यांचा धंदा करणारे मध्यस्थ, दलाल यांचेही फावले. आता काळ बदलतो आहे, त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा कंपन्यामध्ये लागली आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्या आयुर्वेदिक वस्तू व औषधांचा अनेक कंपन्यांनी धसका घेतला आहे. रामदेव बाबा हे आज तरी कमी दराने वनौषधी खरेदी करतात, असे एका पाहणीत आढळून आले आहे. मात्र त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढल्याने त्यांनी करार शेतीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात १९९० मध्ये औषधी व सुगंधी वनस्पती संवर्धन प्रकल्प सुरू झाला. ८३० प्रकारच्या वनौषधी तेथे आहेत. त्यांच्या नर्सरीत १२५ प्रकारच्या वनौषधींची रोपे विक्रीसाठी ठेवलेली आहेत. सर्दी व दम्याकरिता अडुळसा, महिलांच्या आजाराकरिता शतावरी, शक्तिवर्धक अश्वगंधा, मधुमेहाकरिता बेडकी, घशाच्या विकाराकरिता गुंजा तसेच सफेद मुसळी यांच्या रोपांना मोठी मागणी असते. दररोज किमान ५० शेतकरी तरी वनौषधीची शेती करण्यासाठी विचारणा करीत असतात. मात्र बाजारपेठ नसल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. केंद्र सरकारच्या आयुष विभागाने राष्ट्रीय वनस्पती अभियान सुरू केले. त्याकरिता राज्याला पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांकरिता अनुदान योजना राबविण्यास प्रारंभ केला. आता मंडी डेव्हलपमेंट कार्यक्रम विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. विद्यापीठातील प्रमुख प्रभारी अधिकारी डॉ. सुरेश दोडके, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. आर. एस. बागुल यांनी शारंगधर या कंपनीच्या माध्यमातून करार शेतीचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध भागांतील सत्तरहून अधिक शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.

विद्यापीठ शेतकरी व कंपनी यांच्यात करार व्हावा म्हणून प्रयत्न करते. पहिल्यांदाच करार शेतीच्या प्रयोगाला यश मिळत आहे. सध्या तरी हे काम प्राथमिक स्तरावर आहे. मात्र भविष्यात त्याला चांगले दिवस येऊ शकतात. पुणे येथील फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळानेही औरंगाबाद परिसरात तसे प्रयत्न चालविले असून शेतकरी मंडळांना मार्गदर्शन केले आहे. सध्या तरी कंपन्या कमी दरात माल खरेदी करण्याचा प्रस्ताव देतात, त्यामुळे शेतकरी अनकूल नसतात. अनेक बुवा-बाबांच्या कंपन्याही त्याला अपवाद नाहीत. मात्र भविष्यात या शेतीला चांगले दिवस आहेत.

अशोक तुपे – ashok tupe@expressindia.com