• रासायनिक खते – जिरायती कपास – संकरित बियाणांसाठी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश हेक्टरी द्यावे लागते. अमेरिकन बियाणांसाठी नत्र ५० आणि स्फुरद २५ किलो हेक्टरी दिले जाते. तर देशी बियाणांसाठी ३० किलो नत्र हेक्टरी पुरेसे असते. बागायती कपाशीसाठी पेरणीच्यावेळी १६ किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश हेक्टरी दिले जाते. तर पेरणीनंतर ३० दिवसांनी ३२ किलो नत्र देणे आवश्यक असते. तर पेरणीनंतर ६० दिवसांनी ३२ किलो नत्र देतात. संकरित जातीसाठी एकूण १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश देतात.
  • विरळणी – जिरायती कपाशीसाठी प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवून विरळणी करतात. बागायती कपाशीसाठी टोकण करताना ३-४ बिया टोकलेल्या असतात. विरळणी करताना दोन रोपे ठेवतात.
  • आंतरमशागत – जिरायत कपाशीसाठी २१ दिवसांनंतर पहिली कोळपणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार ३-४ कोळपण्या करतात. योग्यवेळी निंदणी करून शेत स्वच्छ ठेवणे उपयुक्त ठरते. बागायती कपाशीसाठी १५ दिवसांच्या अंतराने २-३ खुरपण्या करतात. फुले येण्याच्या वेळी व नंतर ३० दिवसांनी २२ टक्के डीएपी खताच्या द्रावणाची फवारणी फायद्याची ठरते. त्यामुळे बोंडे मोठी व वजनदार होतात. पीक ७० ते ८० दिवसांचे झाल्यावर मुख्य फांद्या व वाढ फांद्यांचे शेंडे खुडतात. तसेच वाढ फांद्यांवरील एकाआड एक पाने तोडतात. त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.