’ प्रस्तावना – गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठीही केला जातो. जनावरांचे खाद्य म्हणूनही केला जातो. गाजरामध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग विविध खाद्यपदार्थामध्ये केला जातो.

’ हवामान आणि जमीन – गाजर हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान ५०-२० अंश से. असावे लागते. १० ते १५ अंश से. तापमानाला तसेच २० ते २५ अंश से. तापमानाला गाजराचा रंग फिकट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. परंतु गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी १८ ते २४ अंश से. तापमान अतिशय पोषक आहे. गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्हणून गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी. भारी जमिनीची मशागत व्यवस्थित करून जमिन भुभुशीत करावी. गाजराच्या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी सामू ६ ते ७ असणारी जमिन निवडावी.

’ सुधारित जाती – पुसा केसर, नानटीस, पुसा मेधाली  या गाजराच्या सुधारित जाती आहेत.