* देशातील पशुधनामुळे सुमारे ४६०० अब्ज रुपयांचे उत्पन्न. त्यातील ३०५४ अब्ज रुपये दुग्धोत्पादक प्राण्यांकडून, ८३६ अब्ज मांसउत्पादक प्राण्यांकडून, अंडीउत्पादनातून १७८ अब्ज, साडेचार अब्ज लोकरनिर्मितीतून व शेणखतापासून ३१८ अब्ज रुपये.
* दुग्धोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक. २०१२-१३मध्ये १३२.४ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन. अकराव्या पंचवार्षिक योजनेत उत्पादनात सुमारे पाच टक्क्य़ांनी वाढ.
*कर्नाल येथील नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅनिमल जेनेटिक रिसोर्सेसच्या संशोधनानुसार, देशात गुरांच्या ३७ जाती, म्हशींच्या १३, शेळ्यांच्या २३, मेंढय़ांच्या ३९, घोडय़ांच्या ६, उंटांच्या ८, कोंबडय़ांच्या १५ आणि डुकरांच्या २ जाती.

आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेचा अहवाल
* जागतिक धान्य उत्पादनात मागील वर्षीपेक्षा यंदा ४ दशलक्ष टनांनी घट होण्याची शक्यता. दक्षिण आफ्रिका आणि भारतातील उत्पादनाला हवामानाचा फटका बसल्यामुळे ही घट.
* सोयाबीनचे ३२२ दशलक्ष टन उत्पादन. मागील वर्षीपेक्षा उत्पादनात एक टक्क्य़ाने वाढ.
* तांदूळ उत्पादनात १ टक्क्य़ाने घट होऊन ४७३ दशलक्ष टन उत्पादन. एल निनोच्या प्रभावामुळे भारत व थायलंडमधील तांदूळ उत्पादनाला फटका.