• हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद लागवड हा शेतकऱ्यांसाठी मुख्य आधार ठरत आहे. येथील १.७ लाख शेतकरी एक लाख नऊ हजार ५३३ हेक्टर जमिनीवर सफरचंद लागवड केली जाते.
  • राज्यातील ४९ टक्के जमिनीवर फलोत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती हिमाचल प्रदेश सरकारने दिली आहे.
  • १९५०-५१ या कालावधीत ४० हेक्टर तर १९६०-६१ या कालावधीत ३ हजार २५ हेक्टर जमीनीवर सफरचंद लागवड करण्यात आली. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार एकूण ८५ टक्के जमीनीवर फलोत्पादन घेतले जात आहे.
  • पोषक हवामान, जमिनीचा पोत यांमुळे सफरचंद लागवडीस लाभदायक परिस्थिती असल्याने हिमाचल प्रदेशात फलोत्पादनास राज्य सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते.
  • शिमला, कुल्लू, किन्नाऊर, मंडी आणि चम्बा या राज्यांमध्ये सफरचंद लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्याचवेळी इतर फळांची लागवडही समाधानकारक आहे.

एप्रिलमे महिन्यांत सात लाख टन डाळींची आयात

  • डाळींची वाढती मागणी आणि कमी उत्पादन यांमुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सात लाख टन डाळींची आयात करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
  • भारतात डाळींचे उत्पादन १७ ते १९.५ दशलक्ष टन असून मागणी २४.६१ दशलक्ष टनांची असल्यामुळे ही आयात करण्यात आल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
  • प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन कमी झाल्यामुळे पुरवठा घटला आणि डाळींची किंमत वाढल्याचे पासवान यांनी सांगितले.