गुजरात सरकारचे कृषी व्यापार धोरण जाहीर

  • गुजरात सरकारने ‘कृषी व्यापर धोरण- २०१६’ जाहीर केले असून त्यानुसार अन्नप्रक्रिया व्यावसायाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
  • कृषी क्षेत्रातली टाकाऊ कचऱ्याचा शेतीच्या विकासासाठी कसा वापर करता येईल, याचाही या धोरणात विचार करण्यात आलेला आहे.
  • खेडा जिल्ह्य़ातील आनंद शहरातील कृषी महोत्सवात गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी या योजनेचे उद्घाटन केले.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, शेतीतील पायाभूत सुविधांचा विकास आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे ही या धोरणाची उद्दीष्टे असल्याचे आनंदीबेन पटेल यांनी सांगितले.
  • अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्प सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्याचा या धोरणात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अन्नप्रक्रिया उद्योगाची केंद्रे सुरू करणाऱ्यांना कर्ज देण्याचाही गुजरात सरकारचा प्रयत्न आहे.

प. बंगालमध्ये पाण्याअभावी भीषण परिस्थिती

  • पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्य़ांत ५० अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमान असून पाण्याअभावी भीषण परिस्थिती आहे. मात्र, प. बंगाल सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केलेला नसून त्याबाबत पाहणी करण्यात येणार आहे.
  • पुरुलिया, पश्चिम मिदनापूर, बंकुरा, बरदवान या जिल्ह्य़ांतील परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे राज्याचे कृषीमंत्री पुर्णेदू बसू यांनी सांगितले आहे.
  • या चारही राज्यांतील पिके पाण्याअभावी जळाली आहेत. या जिल्ह्य़ांची पाहणी केल्यानंतर तेथे दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
  • दुष्काळग्रस्त भागासाठी केंद्र सरकारला गतवर्षी अहवाल पाठविण्यात आल्यानंतरही कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप बसू यांनी केला आहे.