• भारतातील चहा उत्पादनात १४.७ टक्के घट झाली आहे. एप्रिलपर्यंत देशातील चहा उत्पादन ६७.२१ दशलक्ष किलो झाले आहे.
  • मोठय़ा प्रमाणात झालेल्या पावसामुळे चहा उत्पादनात घट झाल्याचे आसाममधील चहा मंडळाने सांगितले आहे.
  • आसाममधील चहा उत्पादनात ११.३ टक्के घट झाली आहे. ती घट ३१.१६ दशलक्ष किलो इतकी आहे.
  • भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. भारताकडून करण्यात येणाऱ्या चहा निर्यातीतही २.२ टक्के इतकी घट झाली आहे.
  • भारताने नुकतीच २३० दशलक्ष किलो चहा निर्यात करून ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी चहा उत्पादनात झालेली घट चिंता वाढविणारी आहे.

मत्स्यक्रांतीला केंद्र सरकार चालना देणार

  • मासे आणि माश्याच्या विविध उत्पादनांची निर्यात पुढील पाच वर्षांत १ लाख कोटीपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मत्स्यक्रांतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. २०१४-१५ या वर्षांत मासे आणि संबंधित उत्पादनांद्वारे भारताने ३३ हजार ४४१ कोटी रुपये मिळविले.
  • कृषी मंत्रालय पुढील महिन्यात मत्स्यशेतीसाठी नवे धोरण जाहीर करणार असून त्यात ‘अम्ब्रेला’ योजनेचा समावेश करण्यात येणार आहे. मत्स्यउत्पादन वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रालाही सामावून घेण्यात येणार आहे.
  • गोडय़ा पाण्यातील मासेमारी आणि सागरी मासेमारी यांचा विकास करण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरणार असून त्यासाठी राष्ट्रीय मासेमारी विकास मंडळाचीही मदत घेतली जाणार आहे.