मान्सूनच्या विलंबाचा पेरणीवर परिणाम नाही’

  • यंदा मान्सूनला विलंब झाला तरी त्याचा पेरणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
  • मोसमी वाऱ्यांची वाटचाल पाहता ७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. प्रसारमाध्यमांनी मान्सून काही दिवस लांबणीपर पडेल अशी शक्यता वर्तविली होती.
  • भारतीय हवामान विभागाचे प्रमुख लक्ष्मण सिंग राठोड म्हणाले की, सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे.
  • भारतातील शेती मोठय़ा प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सून १ जून रोजी केरळमध्ये येईल त्यानंतर जुलैच्या मध्यांतराला संपूर्ण देशात मान्सून कार्यान्वित होईल.
  • मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता पेरणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.

डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राचा कृती आराखडा

  • डाळींच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्राने ठोस पाऊल उचलले असून उत्पादन वाढविण्यासाठी पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • २०१५-१६ या वर्षांत डाळींचे १७.०६ दशलक्ष टन उत्पादन झाले असून हे उत्पादन २०२०-२१ या वर्षांत २४ दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील डाळ उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राने हा आराखडा तयार केला आहे.