शेती किफायतशीर किंबहुना फायदेशीर होण्याच्या दृष्टीने काय करणे गरजेचे आहे याचा विचार होऊ लागला आणि त्यातूनच आता मोठय़ा प्रमाणात नसíगक शेती अंगीकारली जाऊ लागली आहे. विषमुक्त अन्न ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांचा मोठा वर्ग अशा प्रकारच्या शेतीकडे वळला आहे. नसíगकरीत्या शेती उत्पादने तयार होऊ लागल्याने ग्राहकही आरोग्यास लाभदायक ठरणारी ही उत्पादने आनंदाने खरेदी करू लागला आहे.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

सुपीक जमीन, पाण्याची मुबलकता, हातासरशी हव्या तितक्या खताची उपलब्धता, पुरेसे मनुष्यबळ इतक्या साऱ्या जमेच्या गोष्टी असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील शेती म्हणजे पोत्याचे अर्थकारण बनत चालली आहे. त्यातून उसासारखे नगदी पीक एकामागून एक घेण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. परिणामी, जमिनीचा पोत बिघडू लागला आहे. पीक कोणतेही घ्या, त्याची उत्पादकता कमी होत चालली आहे. शेतकरी आणि शेती अभ्यासकांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय बनला आहे. या चक्रातून बाहेर पडून शेती किफायतशीर किंबहुना फायदेशीर होण्याच्या दृष्टीने काय करणे गरजेचे आहे याचा विचार होऊ लागला आणि त्यातूनच आता या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात नसíगक शेती अंगीकारली जाऊ लागली आहे. विषमुक्त अन्न ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांचा मोठा वर्ग अशा प्रकारच्या शेतीकडे वळला आहे. नसíगकरीत्या शेती उत्पादने तयार होऊ लागल्याने ग्राहकही आरोग्यास लाभदायक ठरणारी ही उत्पादने आनंदाने खरेदी करू लागला आहे. त्यातून शेतकरी आणि ग्राहक यांची परस्परांना उपयुक्त ठरणारी हितकारक साखळी तयार होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्धता मोठय़ा प्रमाणात आहे. कृष्णा खोऱ्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्य़ातील मोठा भाग जलसिंचनाखाली आला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळला. उसाचे पीक वारंवार घेऊ लागल्याने शेतकरी आळसी बनू लागला आहे. वर्षांनुवष्रे ऊसपिकाचे उत्पन्न घेतले जाऊ लागल्याने त्याचे तोटेही आता जाणवू लागले आहेत. जमीन क्षारपड होण्याबरोबरच प्रति एकरी ऊस उत्पादनात घट होऊ लागली आहे. उसाला हमीभाव मिळत असला तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत हाती येणारा पसा हा अपेक्षेइतकाही नसल्याचे शेतकऱ्यांना समजू लागले आहे. उसाची शेती ही तोटय़ाची शेती बनत चालल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. अन्य कोणती पिके घ्यायची झाली तर त्याचाही उत्पादन खर्च आणि बाजारात विक्री झाल्यानंतर मिळणारे पसे याचा काहीच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे ऊस सोडून अन्य पिकांकडे वळावे तर तेथेही ना उत्पादनाची खात्री मिळते, ना दराची. अशा पेचामध्ये बळीराजा अडकला आहे.

या बिकट स्थितीतून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? याचा विचार गावोगावचे शेतकरी करताना दिसत आहेत. यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग नसíगक शेतीकडे वळला आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे मार्गदर्शन घेऊन हा वर्ग नसíगक शेतीमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांशिवाय आणि अतिशय कमी पाण्यात नसíगक पद्धतीने झिरो बजेटमध्ये नसíगक शेती करता येते. केवळ करताच येते असे नाही, तर ती शेतकऱ्याला आíथकदृष्टय़ा समृद्धही करते याचा दाखला अवघ्या एक दोन वर्षांमध्येच या भागातील शेतकऱ्यांना आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे प्रयोग केले आहेत, ते पाहून आजूबाजूच्या गावांतील शेतकरीही या प्रकारच्या शेतीकडे वळताना दिसत आहेत. किंबहुना, याचमुळे आज राज्यात सुमारे ६० लाखांवर शेतकरी नसíगक शेतीची कास धरून आहे.

एका देशी गाईच्या गौमय व गोमूत्रापासून ३० एकर शेतकी रासायनिक खते, कीटक नाशके यांच्याशिवाय करता येते हे पाळेकर यांचे संशोधन प्रत्यक्ष कृष्णा-पंचगंगा काठच्या शेतीमध्ये आकाराला येत आहे. सेंद्रिय शेती म्हणजेच नसíगक शेती असा एक समज लोकांमध्ये आहे, मात्र या दोन्हीमध्ये फरक आहे. सेंद्रिय शेतीसाठी लागणारी निविष्ठा ही बाहेरून आणावी लागते. तर नसíगक शेतीमध्ये शेतकऱ्याच्या गोठय़ातील गोमूत्र, शेणखत याचा वापर करून झिरो बजेट पद्धतीने शेती केली जात आहे. त्याचे अनेक चांगले प्रयोग या भागामध्ये पाहायला मिळत आहेत.

निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालचंद्र मगदुम यांच्या शेतातील िलबाची झाडे वाळून जाण्याच्या बेतात असताना त्यास गोमूत्र, शेण, गूळ, कडधान्याचे पीठ याचा समावेश असलेले जिवामृत वापरले आणि झाडे पुन्हा फुलली. त्यांच्या शेतातील शेवग्याला अधूनमधून शेवगा पिकत असे, पण आता बारमाही शेवगा फुललेला कसा असतो याचे आश्चर्य त्यांना वाटत आहे. त्यांचा हा उपक्रम पाहून अनेक शेतकरी अशा पद्धतीने शेती करून शेतीचा आनंद लुटत आहेत.

राजगोंड भुजकर यांची या पद्धतीने केळीची बाग फुलवली असून केळी उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे ते सांगतात. मामासाहेब कोथळे हे व्यावसायिक पण नंतर शेतीकडे वळले. त्यांच्या शेतातील उसाला लोकरी माव्याची लागण झाली. जिवामृताचा वापर केल्यावर लोकरी मावा कायमचा नामशेष झाला. काकासाहेब व्हनाळी हेही लघुउद्योजक. कृषी पर्यटनाच्या निमित्ताने ते शेतीकडे वळले. नऊ फूट पट्टय़ाची सरी करून त्यांनी ऊस लागण केली असून तब्बल तीन आंतरपिके घेऊन ऊस शेती फायदेशीर बनविली आहे. उसाचे सव्वाशे टन उत्पादन झाले असले तरी ते आणखीन वाढवण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेली तीन वष्रे सुरेश कुलकर्णी नसíगक पद्धतीने ऊस पिकवतात. आपल्याच गुऱ्हाळात त्यांनी एक एकरात ४२ टन उसाचे उत्पादन करून पाच टन गूळ व ४०० किलो काकवी उत्पादित करून पावणेतीन लाख रुपये उत्पन्न मिळविले. खर्च वजा जाता सव्वादोन लाखांचा नफा झाल्याचे ते सांगतात. धनंजय गुंडे यांची देशी केळीची बाग असो की रवींद्र चौगले यांची शेती असो. इथेही अशा प्रकारचे अनुभव आले आहेत. हुपरी परिसरात महावीर शेंडुरे, घनश्याम आचार्य आदींच्या पुढाकाराने नसíगक शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या किसान मंचची स्थापना झाली आहे. याद्वारे ते शेतकऱ्यांना नसíगक शेतीचे लाभ समजावून सांगण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच त्यांनी २१ ते २५ मे या कालावधीत सुभाष पाळेकर यांचे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण या भागातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. या संदर्भातील माहितीसाठी घनश्याम आचार्य (९४२३२८५१८१) या क्रमांकाशी संपर्क साधता येईल. मुख्य म्हणजे या प्रकारच्या उत्पादनामुळे शहरी भागातील नागरिकांना नसíगकरीत्या पिकविलेली शेती उत्पादने, भाजीपाला मिळू लागला आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे होणारे कर्करोग, रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांना आवर घालणे नसíगक शेतीतील उत्पादनामुळे शक्य झाले आहे. नागरिकांना निरोगी जगण्याचा अधिकार आणि शेतकऱ्यांना नसíगक शेतीतून समृद्ध होण्याचा मार्ग या उपक्रमातून मिळाला असून, ग्राहक व शेतकरी यांची परस्पर हिताची लाभदायक साखळी निर्माण झाली आहे.

dayanandlipare@gmail.com