चाकोरीबाहेरच्या विषयांचं वैविध्य हे मराठी चित्रपटांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिले आहे. पण असे विषय हाताळताना त्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता हवी असते. ती नसेल तर काय होऊ शकते याचं प्रत्यंतर म्हणजे ‘तू ही रे’. लग्नानंतर फुललेलं प्रेम, त्यातून तयार झालेले नात्याचे घट्ट बंध, केवळ कर्तव्याच्या पलीकडे असणारी भावना. अशा सुखी संसाराचं चित्र आणि त्यात येणारं अनाकलनीय संकट. त्यातून निर्माण होणारी अनावस्था, त्यातून तरुन जाण्याची धडपड असं हे काहीसं वेगळं कथासूत्र. चित्रपटीय रुपांतर होताना त्यातून ही सारी धडपड जाणवतेच असं मात्र म्हणता येत नाही. तर एकंदरीतच मेलोड्रामाचा बाज अधिक झाल्यामुळे एक लग्नानंतरच्या लव्हस्टेरीचा हा चांगला विषय काहीसा का होईना बटबटीतपणाकडे झुकलेला जाणवतो.

नंदिनी ही एका गावातील पाटलाची स्वच्छंदी मुलगी. प्रेमविवाह करावा अशी मनोमनी इच्छा बाळगणारी. पण वडिलांच्या आज्ञेवरुन मुंबईतल्या टेक्सटाईल मिलमध्ये उच्च पदावर काम करणाºया अभियंता सिद्धार्थशी तिचा विवाह होतो. आठ वर्षाच्या सुखी संसारात रममाण झालेल्या त्यांच्या आयुष्यात अचानक एक वादळ येतं. त्याला सिद्धार्थचं पूर्वायुष्य जबाबदार असतं. टेक्सटाईल मिलसाठी सरकारी अनुदान मिळवून देणाºया सरकारी कमिटीचे प्रमुख असणारे खासदार सिद्धार्थला त्याच्या बायकोला सोडून द्यायला सांगतात. त्यामागे सिद्धार्थच्या आयुष्यातील पूर्वघटना कारणीभूत असतात. नंदिनीला यातलं काहीच माहीत नसतं. आणि अचानक एक दिवशी सिद्धार्थ आणि त्या खासदाराच्या मुलीच्या भैरवीच्या लग्नाचे फोटो कुरिअरद्वारे नंदिनीला मिळतात. नंदिनीचा शोध सुरु होतो. ती सैरभैर होते, भांबावते, गोंधळते. प्रेम विवाह करायची इच्छा असणाºया नंदिनीच्या आयुष्यात लग्नानंतरच्या प्रेमामुळे आलेल्या सुखाला एक जोरदार ठेच लागते. त्यातून ती सावरते की कोसळते हा या कथासूत्राचा गाभा.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

सुरुवातीला अगदी पारंपरिक चौकटीतल्या आयुष्याप्रमाणेच झालेली ही कथा उत्तरार्धात वेग पकडते. पण वैवाहीक आयुष्यातील वादळापूर्वीचे पडसाद मांडण्यासाठी घेतलेला वेळ आणि प्रसंग हे कधी कधी निरर्थकच म्हणता येतील असे आहेत. दिग्दर्शनावरची पकड ढिली पडल्याचे जाणवते. तर सई ताम्हणकरला गावातील अल्लड तरुणी म्हणून पाहणं अजिबात पचनी पडत नाही. पण गृहिणी म्हणून तिने बºयापैकी भूमिकेचा ठाव घेतला आहे. तेजस्विनी पंडीतचा तर एक शोपीस म्हणूनच वापर झाला आहे. छोट्या पिऊने मात्र खट्याळपणाने कथानकात बरीच जान आणली आहे. मात्र नंतर नंतर तोचतोचपणा येत राहतो.

चित्रपटात बोल्डनेस असलाच पाहिजे असा काहीसा समज हल्ली मराठी चित्रपटसृष्टीचा झालेला आहे की काय असे दिसते. आणि हा बोल्डनेस केवळ विषयातून न येता तो शरीरप्रदर्शनातून आला पाहिजे अशीच ठाम भूमिका दिसून येते. त्याचं अगदी थेट प्रत्यंतर तू ही रे मध्ये वारंवार येते. थोडक्यात काय तर अति छान छान सेट, बंगले, शाही दिवाणखाने आणि मॉडर्न दिखाऊपणा यातच रममाण झाला आहे. आणि मूळ चांगलं कथासूत्र हरवून गेलं आहे.
निर्माता
करण एंटरटेनमेंट – मृदुला पडवळ- ओझा
शीतल कुंमार – मनेरे
इंडियन फिल्म्स स्टूडिओ – आशिष वाघ आणि उत्पल आचार्य
ड्रिमिंग ट्वेंटी फोर / सेव्हन – दिपक राणे
सहनिर्माता – संजय घोडावत
दिग्दर्शक – संजय जाधव
कथा – मनस्विनी लता रवींद्र
पटकथा संवाद – अरविंद जगताप
छाया दिग्दर्शक – प्रसाद भेंडे
संगीत दिग्दर्शक – अमितराज, पंकज पडघन, शशांक पोवार
गीते – गुरु ठाकूर
गायक – अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, बेला शेंडे, सायली पंकज
वेशभूषा – हर्षदा खानविलकर
कला दिग्दर्शक – सतीश चिपकर
नृत्य दिग्दर्शक – उमेश जाधव, सुजित कुमार
कलाकार, स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी), तेजस्विनी पंडित (भैरवी), मृणाल जाधव (पिऊ), सुशांत शेलार (प्रशांत), गिरीश ओक (प्रतापराव भानुशाली).