जागतिकीकरणाला आता २५ वर्षे झाली. त्याचे फायदे- तोटे सारे काही या एवढय़ा वर्षांत आपण अनुभवले. अर्थव्यवस्थेला बळकटी आली. जगातील पहिल्या तीन बलाढय़ अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. साधारणपणे त्याच सुमारास आलेल्या आणि भारतात व्यवस्थित स्थिरस्थावर झालेल्या इंटरनेटनेही त्याची कमाल दाखविण्यास सुरुवात केली. या साऱ्याचे परिणाम आपल्या स्वतवर व्यक्ती म्हणून आणि कुटुंबव्यवस्थेवरही न होते तर नवलच.

गेल्या २५ वर्षांत खूप काही बदलले. रेशनकार्डावर असलेले कुटुंब आता प्रत्येकाहाती पासपोर्टपर्यंत पोहोचले खरे, पण त्याच वेळेस रेशनकार्डावरचे कुटुंब गायब झाले. एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाच्या दिशेने झालेला प्रवासही यात अधोरेखित होतो आणि आपल्या गेल्या दोन पिढय़ांची बदललेली मानसिकतादेखील; पण हे एवढेच नाही. समृद्धी आणि वैयक्तिक करिअरादी गोष्टींमुळे आताच्या नवीन पिढीला व त्यांच्या पालकांच्या पिढीलाही नव्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. या आपल्या समाजाच्या समस्या आहेत. आपली संस्कृती ही पाश्चिमात्यांसारखी पराकोटीची व्यक्तिकेंद्रीही नाही, त्यामुळे धड मागे ना, धड पुढे आणि सांगताही येत नाही, कारण कळतच नाही अशीच काहीशी अवस्था आहे. अशा वेळेस आपण विद्यमान स्थितीचा आढावा घेऊन भविष्यासाठी तयार व्हायला हवे. आपल्या मनातील जुन्या संकल्पनांना सोडचिठ्ठी देऊन साकल्याने विचार करीत नव्याचा स्वीकार करण्याचीही हीच योग्य वेळ आहे. म्हणून या नव्याचा शोध घेण्यासाठी ‘लोकप्रभा’ दिवाळीनिमित्त आम्ही दोन उपक्रम हाती घेतले. नव्या विषयांचा वेध घेणारी कथा स्पर्धा आणि बदलत्या कुटुंबव्यवस्थेचा भविष्यवेध घेणारे सर्वेक्षण. आणखी २५ वर्षांनी आपल्या समस्या काय असतील, याचा घेतलेला वेध. पर्सनल स्पेस, वैयक्तिक अवकाश प्रत्येकाला महत्त्वाचे वाटते आहे; पण त्याबाबत आपण अद्याप फारसा विचार केलेला नाही. त्याचप्रमाणे भविष्यातील वृद्ध संगोपनाचाही विचार केलेला नाही, हे या सर्वेक्षणातून समोर आले. आज जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश भविष्यात कदाचित सर्वाधिक वृद्ध असणारा देश असेल. नंतर समस्या नको असतील तर त्याचा विचार २५ वर्षे आधी म्हणजे आत्ताच केला तर नियोजन करता येईल.

New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
vasai virar municipal corporation marathi news, vasai virar property tax marathi news
वसई: पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट अपूर्ण, यंदाच्या वर्षी ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली

अलीकडे नियोजन करायचे म्हटले आणि ते खूप मोठय़ा प्रमाणावरील असेल तर सारे वळतात बिग डेटाकडे; पण त्याही बाबतीत गोंधळ खूप आहे. माहितीचा भस्मासुर आपल्यालाच खाक तर नाही ना करणार याची भीती आहे आणि आता यापासून सुटकाच नाही, याची जाणीवदेखील. हीच वेळ आहे, त्याही संदर्भातील जाणीवजागृतीची. या साऱ्या परिवर्तनाच्या आणि आर्थिक क्रांतीच्या लाटेमध्ये सारे काही बदलते आहे, अपवाद आहे तो मानवी मूल्यांचा आणि संस्कारांचा. आर्थिक समृद्धीच्या वाटेवर असताना कदाचित याकडे थोडे दुर्लक्षही झाले असेल. म्हणूनच कदाचित सरकारला काळ्या पैशाविरोधातील मोहीम हाती घ्यावी लागते. दिवाळी हा प्रकाशाचा सण. कदाचित हे निमित्त ठरावे, प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी! नेहमी खरे बोलावे, चांगलेच काम करावे, वर्तन शुद्ध असावे, जीविकाही चांगल्या उद्दिष्टांचे लक्ष्य असलेली असावी. ही मूल्ये बिग डेटातून येणार नाहीत. ती माणसावरील संस्कारामधूनच येणार आहेत, ती अमूल्य आहेत. याचे भान ठेवून काहीशी अडगळीत गेलेली ही मानवी मूल्ये दिवाळीच्या निमित्ताने लख्ख करून उजेडात आणू या. प्रकाशाच्या वाटेवर हीच खरी दिवाळी!

vinayak-signature

विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com