उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. पोपट पवार, सीताबाई पवार, आशाबाई पवार, सखुबाई पवार,नानीबाई पवार आणि आकाबाई पवार अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींची नावे आहेत.

येरमाळा येथे २०१२ साली पोलीस पथक पोपट पवार या आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती. यावेळी पोपट पवार आणि त्यांच्या साथीदारांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्या पथकावर हल्ला केला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. तसेच त्यांच्यावर रॉकेल टाकून त्यांना जाळण्याचाही प्रयत्न केला होता.