रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीकाठावरील एका शेतात आज एका १२ फूट लांबीच्या मगरीला मंगळवारी ग्रामस्थांनी पकडले. नंतर ती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केली. दरम्यान, मगर पकडल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, नदी परिसरातील शेतात आणखी एक मगर असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
इचलकरंजीनजीक रुई इथे गेल्या काही दिवसांपासून नदीकाठावरील शेतात दोन मगरींचा वावर असल्याची पंधरवडय़ापासून चर्चा सुरू होती. त्यामुळे मासेमारी, पोहण्यासाठी जाणारे नागरिक व नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगर पकडण्यासाठी पाहणीही केली होती. दरम्यान, पावसाने जोर धरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले होते. परिणामी, मगरीला पकडणे लांबणीवर पडले होते.
मंगळवारी सकाळी बिराजे-पाटील मळीत बाळू बिराजे व संजय पाटील हे शेतातील गवत काढण्यासाठी गेले असता त्यांना गवतामध्ये निपचित पडलेली मगर दिसली. थोडय़ा वेळाने मगरीची हालचाल सुरू झाल्याचे पाहून दोघांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी तातडीने सरपंच संजय मगदूम व मित्रांना त्याची माहिती दिली. त्यानंतर रवींद्र माने, प्रमोद बिराजे, भूपाल माने, जयकुमार बिराजे तसेच इचलकरंजीतील गणेश कांबळे, परशुराम सांगावे, इराप्पाण्णा संपण्णावर, हरीषप्रसाद शेरीगार आदींनी शेतात धाव घेतली.
मगर पकडण्याच्या उद्देशाने आलेल्या या कार्यकर्त्यांनी दोरी टाकून मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. जमाव जमल्याने मगरीने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावधानता बाळगत फास टाकून मगरीचे तोंड बांधले. यामुळे मगरीची धडपड आणखी वाढली. तिच्याजवळ जाण्यास कोण धजावत नसताना परशुराम सांगावे यांनी तिच्या डोळय़ांवर पोते टाकले आणि दोरीचा फास आवळला. अथक प्रयत्नानंतर मगर पकडण्यात यश आले. दोरीने बांधलेली मगर बलगाडीतून गावातील मंगलधामजवळ आणण्यात आली. तेव्हा रुईसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी करवीरचे वन क्षेत्रपाल अनिल निंबाळकर आल्यानंतर त्यांच्याकडे प्राणिमित्र कार्यकर्त्यांनी मगरीला सुपूर्द केले. िनबाळकर यांनी मुख्य वनजीव संरक्षक यांच्या परवानगीनंतर मगरीला सुरक्षित ठिकाणी पाठवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
 
२९ कोल १ (लोकसत्ता पार्सल पान ३ साठी)             ह१(ि288)

२९ कोल १ (लोकसत्ता पार्सल पान ३ साठी)

(लोकसत्ता पार्सल पान ३ साठी)

एआरडी फायनल

पंचगंगा नदीकाठावरील शेतात

सापडली १२ फूट लांबीची मगर

प्रतिनिधी, कोल्हापूर

रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीकाठावरील एका शेतात आज एका १२ फूट लांबीच्या मगरीला मंगळवारी ग्रामस्थांनी पकडले. नंतर ती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केली. दरम्यान, मगर पकडल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, नदी परिसरातील शेतात आणखी एक मगर असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

इचलकरंजीनजीक रुई इथे गेल्या काही दिवसांपासून नदीकाठावरील शेतात दोन मगरींचा वावर असल्याची पंधरवडय़ापासून चर्चा सुरू होती. त्यामुळे मासेमारी, पोहण्यासाठी जाणारे नागरिक व नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगर पकडण्यासाठी पाहणीही केली होती. दरम्यान, पावसाने जोर धरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले होते. परिणामी, मगरीला पकडणे लांबणीवर पडले होते.

मंगळवारी सकाळी बिराजे-पाटील मळीत बाळू बिराजे व संजय पाटील हे शेतातील गवत काढण्यासाठी गेले असता त्यांना गवतामध्ये निपचित पडलेली मगर दिसली. थोडय़ा वेळाने मगरीची हालचाल सुरू झाल्याचे पाहून दोघांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी तातडीने सरपंच संजय मगदूम व मित्रांना त्याची माहिती दिली. त्यानंतर रवींद्र माने, प्रमोद बिराजे, भूपाल माने, जयकुमार बिराजे तसेच इचलकरंजीतील गणेश कांबळे, परशुराम सांगावे, इराप्पाण्णा संपण्णावर, हरीषप्रसाद शेरीगार आदींनी शेतात धाव घेतली.

मगर पकडण्याच्या उद्देशाने आलेल्या या कार्यकर्त्यांनी दोरी टाकून मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. जमाव जमल्याने मगरीने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावधानता बाळगत फास टाकून मगरीचे तोंड बांधले. यामुळे मगरीची धडपड आणखी वाढली. तिच्याजवळ जाण्यास कोण धजावत नसताना परशुराम सांगावे यांनी तिच्या डोळय़ांवर पोते टाकले आणि दोरीचा फास आवळला. अथक प्रयत्नानंतर मगर पकडण्यात यश आले. दोरीने बांधलेली मगर बलगाडीतून गावातील मंगलधामजवळ आणण्यात आली. तेव्हा रुईसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी करवीरचे वन क्षेत्रपाल अनिल िनबाळकर आल्यानंतर त्यांच्याकडे प्राणिमित्र कार्यकर्त्यांनी मगरीला सुपूर्द केले. िनबाळकर यांनी मुख्य वनजीव संरक्षक यांच्या परवानगीनंतर मगरीला सुरक्षित ठिकाणी पाठवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

——

फोटो – २९ मगर २,