पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास स्विफ्ट गाडीने दुचाकीला धडक दिली. अतिशय वेगात असलेल्या स्विफ्टने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवडमधील शाहूनगर भागात सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या मारुती स्विफ्ट गाडीने एका दुचाकीला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी ३० फूट फरफटत गेली. या अपघातात दुचाकीवरील अनिल बनगर आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर स्विफ्टने डस्टर गाडीला धडक दिली. या अपघातात स्विफ्टचा चक्काचूर झाला असून चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे.