विधानसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्य़ातील क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर उद्या (बुधवारी) होणार आहे. प्रशिक्षणास गरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ३ विधानसभा मतदारसंघ असून, िहगोली मतदारसंघांतर्गत सुमारे २ हजार ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. या कर्मचाऱ्यांना िलबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतनात सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत दोन सत्रांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी खुदाबक्ष तडवी व सहायक विद्याचरण कडवकर यांनी ही माहिती दिली. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोबत दोन छायाचित्रे आणावीत, त्या आधारे त्यांना ओळखपत्र दिले जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. १२ क्रमांकाच्या अर्जावर त्यांचा मतदारयादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक, पत्ता भरून त्यासोबत निवडणूक ओळखपत्राची सत्यप्रत व निवडणूक आदेशाची सत्यप्रत सोबत जोडून जमा करावेत. त्या आधारे निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना टपाल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कडवकर यांनी सांगितले. आवश्यक कागदपत्रे न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाल बॅलेटची सुविधा मिळणार नाही.