२९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांकडे सापडलेली सुमारे ५८ लाखाची रोकड बेहिशेबी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी काही संबंध आहे काय, याची छाननी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. ही रोकड ज्या तीन कर्मचाऱ्यांकडे सापडली, त्यांना न्यायालयाने २९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे बाजार समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपीक दिगंबर चिखले, लेखापाल अरविंद जैन आणि स्टेनो विजय निकम यांच्याकडे ही रक्कम आढळली होती. एनडीसीसी बँकेच्या पेठरोड शाखेतून ही रक्कम काढून संशयित स्विफ्ट मोटारीतून घेऊन निघाले होते. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अश्वमेधनगरकडे जाणाऱ्या मार्गावर ही मोटार रोखण्यात आली. यावेळी त्यात ५७ लाख ७३ हजार ८०० रुपये संशयितांकडे असल्याचे आढळून आले. या रकमेबाबत विचारणा केली असता संशयितांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. संशयितांकडील रक्कम बेहिशेबी असल्याचे निदर्शनास आले. लोकसेवकांनी बेहिशेबी मालमत्ता ताब्यात ठेवून समाधानकारक खुलासा न देता गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला. या संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दौलत जाधव आणि उप अधीक्षक पी. व्ही. उगले यांनी दिली.

चर्चेला उधाण

या कारवाईबाबत बाजार समितीच्या वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात सापडलेल्या रोकडचा बाजार समिती वा पदाधिकाऱ्यांशी काही संबंध आहे काय, याची स्पष्टता तपासात होईल, असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले. ज्या मोटारीत ही रोकड नेली जात होती, ती कोणाची होती, ज्या बँक खात्यातून ही रक्कम काढली गेली ते कोणते होते, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.