एका शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी तब्बल ३३ वर्षांनंतर एका महिलेसह तिघा आरोपींना बार्शी पोलिसांनी अटक केली. या तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
प्रभावती गायकवाड, सतीश गायकवाड आणि नेताजी जाधव (रा.कव्हे, ता. बार्शी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ३३ वर्षांपूर्वी गुन्हा घडला, त्यावेळी या आरोपींचा वयोगट ३६ ते ४९ वर्षांचा होता. आज अटक केली असता तिघेही आरोपी वृद्ध आहेत.
१९८२ साली कव्हे येथे शेतजमिनीच्या आणि घरासमोर म्हैस बांधण्याच्या वादातून सतीश गायकवाड व इतरांनी विठ्ठल िशगण (वय ४०) यांच्या घरावर हल्ला करून त्यांचा जनावरांचा गोठा पेटविला होता. हल्ल्यात विठ्ठल िशगण हे गंभीर जखमी होऊन मरण पावले होते. या गुन्हय़ाची नोंद वैराग पोलीस ठाण्यात झाली होती.
तथापि, गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरारीच होते. दिल्लीत आठ वष्रे, राजस्थानात १० वष्रे आणि त्यानंतर मुंबई, पुणे व बारामती येथे आरोपींनी वास्तव्य केले होते.