उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी असून मनसेच्या या अल्टीमेटमवर अनेक संमिश्र प्रतिक्रीया समोर आल्या आहेत. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना केलेला विरोध पाहता ज्या वाहिन्यांनी त्यांच्या कार्यक्रमांतून पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली आहे त्यांचे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अभिनंदन केले.

वाचा: टेलिव्हिजनवरील पाकिस्तानी कलाकारांच्या मालिकांची ‘घरवापसी’
पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून जाण्याचा आदेश दिल्यानंतर, आता ही मुदत उलटली असताना ‘पाक कलाकार लपून बसला असेल तर हुसकावून लावू..’ अशा भूमिकेवर मनसे ठाम आहे. याआधी हा इशारा देतानाच पाकिस्तानी कलाकारंनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशारा मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता.

वाचा: हात जोडून सांगतो, आम्हाला एकटं सोडा- करण जोहर