बीड जिल्ह्यातील गाडे पिंपळगावात महाप्रसादातून ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रावणी एकादशी असल्याने गाडे पिंपळगावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना साबूदाणा खिचडी महाप्रसाद म्हणून वाटण्यात आली होती. ही खिचडी खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, अतिसार आणि चक्कर येणे, असे त्रास होण्यास सुरूवात झाली. एकाचवेळी अनेकांना हा त्रास झाल्याने  परिसरात गोंधळ उडाला आणि विषबाधा झाल्याची शंका येथील अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्रास झालेल्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांवर परळी आणि सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(संग्रहित छायाचित्र)