विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ात बुधवारी उत्साहात ७०.७४ टक्के मतदान झाले. कोपरगाव सर्वाधिक म्हणजे तब्बल ७९.८३ तर, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच नगर शहर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ५९.८८ टक्के मतदान झाले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा तपशील जिल्हा प्रशासनाकडे आज उपलब्ध झाला. जिल्हय़ातील बाराही मतदारसंघांतील एकूण ३२ लाख ३० हजार ४७ पैकी २२ लाख ८५ हजार ९२ मतदारांनी हा हक्क बजावला. यात महिलांचे प्रमाण थोडय़ाफार फरकाने पुरुषांच्या बरोबरीने आहे. कोपरगाव येथे २ लाख ४५ हजार ३०७ पैकी १ लाख ९५ हजार ८३९ मतदारांनी विक्रमी मतदान केले. यात महिलांची संख्या ९३ हजार ३५९ (७९ टक्के) आणि पुरुषांची संख्या १ लाख २ हजार ४८० (८१ टक्के) आहे.
अकोले, संगमनेर, नेवासे, शेवगाव, राहुरी व श्रीगोंदे येथे उत्साहात ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. नगर शहर वगळता अन्य मतदारसंघांतही ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. जिल्हय़ातील शेवगाव, पारनेर आणि श्रीगोंदे या तीन मतदारसंघांत २ लाखांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदानसंख्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आहे. येथील मतदानाही जिल्हय़ात सर्वाधिक म्हणजे ३ लाख १४ हजार ७९७ असून झालेले मतदानही सर्वाधिक म्हणजे २ लाख २८ हजार २७३ आहे.
जिल्हय़ातील मतदारसंघनिहाय मतदानाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एकूण मतदान-झालेले मतदान-टक्केवारी या क्रमाने ही आकडेवारी आहे.
अकोले : २ लाख ३७ हजार ९५३- १ लाख ६० हजार ३६४-६७.३९
संगमनेर : २ लाख ५३ हजार १५५- १ लाख ८० हजार ७३९-७१.३९
शिर्डी : २ लाख ४९ हजार ९५१-१ लाख ९१ हजार ६०६-७६.६५
कोपरगाव : २ लाख ४५ हजार ३०७-१ लाख ९५ हजार ८३९-७९.८३
श्रीरामपूर : २ लाख ६४ हजार ५०९-१ लाख ८१ हजार ५४८-६८.६४
नेवासे : २ लाख ३८ हजार ८७३-१ लाख ७७ हजार ६३०-७४.३६
शेवगाव/पाथर्डी : ३ लाख १४ हजार ७९७-२ लाख २८ हजार २७३-७२.५१
राहुरी : २ लाख ७१ हजार ३३५-१ लाख ९३ हजार १९१-७१.२०
पारनेर : २ लाख ९२ हजार ६०७-२ लाख ४४०-६८.५०
नगर : २ लाख ७४ हजार ८९२-१ लाख ६४ हजार ६१२-५९.८८
श्रीगोंदे : २ लाख ९१ हजार ७१४-२ लाख १५ हजार ८५९-७४
कर्जत/जामखेड : २ लाख ९४ हजार ९२६-१ लाख ९४ हजार ९८१-६६.११