मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मराठी सारस्वतांच्या महाउत्सवास अर्थात ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चिपळूण नगरीत सकाळी साठेआठ वाजता ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. चिपळुणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथदिंडीमध्ये जवळपास पाच हजारांहून अधिक साहित्यरसिक सहभागी झाले होते. १५० वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराची स्थापना जेथून झाली तिथून निघालेली ही दिंडी शहरातून यशवंतराव चव्हाण संमेलनस्थळी पोहोचली. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यासह निमंत्रित आणि संमेलन प्रतिनिधी मोठय़ा संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.
त्यानंतर सकाळी ११ वाजता वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दुपारी ३ वाजता महामंडळाच्या उपाध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून साडेतीन वाजता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होईल. याप्रसंगी मावळते अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, स्वागताध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडीमध्ये विविध संदेश देणारे फलक घेऊन शालेय विद्यार्थी आणि महाराष्ट्रीच्य़ा संस्कृ़तीचा अभिमान जागवणारे चित्ररथही यामध्ये सहभागी झाले होते.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















