श्रीगोंदे नगरपरिषदेचे ९२ कोटी ७४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी मंजूर करण्यात आले. कोणतीही करवाढ नसल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक उलाढालीचा अंदाजपत्रक आहे.
अंदाजपत्रक मंजुरीसाठी पालिकेची आज सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष छाया गोरे होत्या.
अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. पाणी योजनेसाठी २४ कोटी ११ लाख ९६ हजार रुपये, तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत शेखमहंमद महाराज मठाच्या परिसर सुशोभीकरणासाठी ३ कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत ४० कोटी, नावीन्यपूर्ण योजनेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून सुलभ शौचालय, व्यावसायिक गाळे आदी गोष्टींचा समावेश आहे.